Jayakwadi Dam Project Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Power Project : प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध

Fishermen oppose solar power project : जायकवाडी नाथसागर धरणावर होत असलेल्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध होत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : जायकवाडी नाथसागर धरणावर होत असलेल्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांकडून विरोध होत आहे. बुधवारी (ता. ७) रोजी भल्या पहाटेच प्रशासनाची दिशाभूल करून हजारो मच्छीमार महिला मुलांसह नाथसागरात जलसमाधी घेण्यासाठी उतरले होते.

जायकवाडी मच्छीमार संघर्ष समितीच्या आंदोलनाची दखल घेत पदाधिकाऱ्यांना पाटबंधारे गोदावरी विकास महामंडळ प्रशासनाने, जिल्हा अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर प्रशासनाने ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची ग्वाही दिल्यामुळे भल्या पहाटे पासून सुरू झालेले हे जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे संयोजन समितीच्या तर्फे सांगण्यात आले.

जायकवाडी धरणावरील १५ हजार एकरातील तरंगता सौर प्रकल्पाच्या विरोधातील लढा वाढण्याची शक्यता असून बुधवारी (ता. ७) जायकवाडी धरणावर मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन दुपारी १२ वाजता आंदोलन केले.

पोलीस आंदोलकांना रोखतील म्हणून हजारो आंदोलक धरणावर पहाटेपासूनच जायकवाडी धरणावर दाखल झाले होते. जायकवाडी प्रकल्पातील नियोजित तरंगते सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्यात, यावे या मागणीसाठी कहार भोई आणि भिल्ल समाजाचे शेकडो मच्छीमार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते.

हा प्रकल्प रद्द न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. या प्रकल्पामुळे जायकवाडी जलाशयामध्ये असलेले विविध प्रजातींची मासे ऑक्सिजन विना मरण पावतील अशी देखील भीती असल्याने सरकारने तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

Farmer Loan Waiver: वनपट्टाधारक, वारसांना मिळणार कर्जमाफी

Potato Crop Damage: पावसाअभावी बटाटा पीक करपले; पंचनाम्यांची मागणी

Ganesh Festival: गणरायाचे उत्साहात आगमन

Silk Farming: ‘सॉइल टू सिल्क’मधून मूल्यसाखळी उभारणी

SCROLL FOR NEXT