Tarang FPO Mela Opening Agrowon
ॲग्रो विशेष

Tarang FPO Mela : दर्जेदार उत्पादनाला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्रीची संधी

NABARD General Manager Dr. Pradeep Parate : सर्व बँकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेळेवर वित्त सहायता केली तर त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असे मत नाबार्डचे जनरल मॅनेजर डॉ. प्रदीप पराते यांनी व्यक्‍त केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करावे. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पन्न वाढेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या उत्पादित मालाचा व उत्पादनाचा दर्जावर काम करावे.

त्यामुळे त्यांच्या उत्पादनांना देश पातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर विक्री शक्य होईल. सर्व बँकांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेळेवर वित्त सहायता केली तर त्या चांगल्या प्रकारे काम करू शकतील, असे मत नाबार्डचे जनरल मॅनेजर डॉ. प्रदीप पराते यांनी व्यक्‍त केले.

शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित कृषी उत्पादनांच्या प्रचार प्रसार आणि विक्रीसाठी ‘तरंग एफपीओ मेला’चे आयोजन नाबार्ड, एसएफएसी आणि ओएनडीसी यांच्यावतीने आयोजन शहरातील पाटीदार भवन येथे शनिवारपासून (ता. २७) करण्यात आले आहे.

या ‘मेला’च्या उद्‍घाटन प्रसंगी डॉ. पराते बोलत होते. सोमवारपर्यंत (ता. २९) हा मेला सुरू राहणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील ४० शेतकरी उत्पादक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यामध्ये वीस कंपन्या नाबार्ड मार्फत, तर वीस कंपन्या एसएफएसी मार्फत सहभागी झाल्या.

सहभागी कंपन्यांमध्ये सर्वाधिक मराठवाड्यातील, तर त्यापाठोपाठ नगर व पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग आहे. आयोजनाचा मुख्य उद्देश शेतकरी उत्पादक कंपनी उत्पादित आणि प्रक्रिया केलेल्या मालाच्या खरेदीविक्रीसाठी एक व्यासपीठ निर्माण करणे हा आहे.

मेळाव्यात सहभागी होणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्तम प्रतीच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करतील. यात कृषी उत्पादने, फळे, भाजीपाला, धान्ये, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ आणि इतर विविध वस्तूंचा समावेश असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT