Orange Orchard  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Orchard : फलोत्पादन विकास अभियानातून फळबागांची संधी

Team Agrowon

Nandurbar News : शासन आपल्या दारी मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन फलोत्पादन केले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. या घटकांत विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.

फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

कंदवर्गीयसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख ५० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमान ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

सुटी फुलेसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

मसाला पीक लागवड घटकांत बियावर्गीय व कंदवर्गीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास ३० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १२ हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर बहुवर्षीय मसाला पिकासाठी शेतकऱ्यास ५० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल २० हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

ड्रॅगनफ्रूट फळासाठी शेतकऱ्यास चार लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर स्ट्रॉबेरी फळासाठी शेतकऱ्यास दोन लाख ८० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख १२ हजार प्रतिहेक्टर अनुदान तसेच अवॅकॅडो फळासाठी शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये अनुदान देण्यात येते.

जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT