Agriculture Minister Manikrao Kokate  Agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate Rummy Video : रमी खेळण्याचा विषय छोटा; बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे

Rummy Video : राजीनामा देण्यासारखं घडलं काय? एक फक्त व्हिडीओ काढून माझी बदनामी केली आहे. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे पत्र देणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात स्वत: राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देणार असेही कृषिमंत्री कोकाटे म्हणाले.

Dhananjay Sanap

Manikrao Kokate : रमी खेळण्याचा विषय छोटा आहे. मी रमी खेळतच नव्हतो, माझी बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज सकाळी (ता.२२) पत्रकार परिषदेत दिली आहे.

"राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी कुणाचा विनयभंग केला आहे का, मी चोरी केली आहे का, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलाय, का माझी पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, झालं काय? फक्त एक व्हिडीओ काढून विरोधकांनी माझी बदनामी केली आहे. त्यांना मी कोर्टात खेचणार आहे. तसेच मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानपरिषद सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. मी दोषी आढळलो तर नागपूर अधिवेशनात स्वत: राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देणार" असेही कृषिमंत्री कोकाटे म्हणाले.

कृषिमंत्री कोकाटे विधीमंडळात रमी खेळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर विरोधकांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्यातून सर्वच स्तरावर कृषिमंत्री कोकाटे यांच्यावर टीकेची झोड उठली. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.

कृषिमंत्री कोकाटे यांनी या पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "मला रमी खेळताच येत नाही. ऑनलाईन रमी खेळताना मोबाईल नंबर द्यावा लागतो, बँक खातं संलग्न करावं लागतं. मी माझा मोबाईल नंबर देतो. ऑनलाईन रमी आल्यापासून मी एक रुपयाची रमी खेळलो नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आहे." असे कृषिमंत्री कोकाटे म्हणाले.

कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त 'कृषी समृद्धी योजना'ची जीआर काढण्यात आल्याचे सांगितले. शेती क्षेत्रात ५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीसाठी योजना राबवली जाणार आहे. या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. परंतु आता त्याचा जीआर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करण्यात आला आल्याचे कृषिमंत्री म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT