Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Advance Crop Insurance : चारच महसूल मंडलांना मिळणार विमा अग्रिम

Crop Insurance Scheme : ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने सोयाबीन पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील सात तालुक्यांत सोयाबीन पिकाची स्थिती अतिशय वाईट झाली होती.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : जिल्हाधिकाऱ्यांनी ४१ महसूल मंडलांसाठी अधिसूचना काढली असली तरी विमा कंपनीने केवळ अंजनगावसुर्जी तालुक्यातील चार महसूल मंडळांसाठी परतावा देण्याची तयारी दर्शविली आहे.

ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्याने सोयाबीन पिकाने माना टाकण्यास सुरुवात केली. जिल्ह्यातील सात तालुक्यांत सोयाबीन पिकाची स्थिती अतिशय वाईट झाली होती.

त्यामुळे दुष्काळाचा पहिल्या पावसाच्या खंडाचा ट्रीगर लागू करून अग्रिम देण्याची मागणी वाढली होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सातही तालुक्यातील सोयाबीन पिकाचे सर्वेक्षण करण्यात येऊन ४१ महसूल मंडलांत सरासरी उत्पादनापेक्षा ५० टक्के कमी उत्पादन येण्याचा अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे देण्यात आला. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी २५ टक्के अग्रिम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले.

विमा कंपनीने संयुक्त समितीच्या अहवालावर आक्षेप घेतले. त्यावर झालेल्या सुनावणीत सर्व आक्षेप फेटाळण्यात आले. जिल्हास्तरीय समितीने आक्षेप फेटाळल्यानंतर आता कंपनी विभागीय समिती व नंतर राज्य तसेच केंद्राकडे आक्षेप दाखल करणार आहे. यामागे कंपनीचे वेळकाढू धोरण असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

विमा कंपनीने अंजनगावसुर्जी तालुक्यातील चार महसूल मंडलांतच नुकसान झाल्याचे व उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे मान्य केले आहे. दर्यापूर तालुक्यात उत्पादन सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी नसल्याचा दावा केला आहे. याशिवाय धारणी, चिखलदरा, धामणगावरेल्वे, चांदूररेल्वे, भातकुली या पाच तालुक्यात खंड नसल्याचा दावा करून या पाचही तालुक्यातील २७ महसूल मंडलांना अग्रिम नाकारला आहे.

कंपनीचे आक्षेप

दर्यापूर व अंजनगावसुर्जी तालुक्यांत पीकविमा कंपनी व विभागाच्या उत्पादनात तफावत आहे. भातकुली, चांदूररेल्वे, चिखलदरा, धामणगावरेल्वे व धारणी या तालुक्यांतील २७ महसूल मंडलांत परताव्याचे निकष लागू होत नाहीत. या तालुक्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.

पीक कापणीनंतर सर्वेक्षण करू

पावसाच्या खंडामुळे उत्पादनाची सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे, असा अहवाल आहे. मात्र यास नकार देत विमा कंपनीने आता पीक कापणीनंतर येणाऱ्या उत्पादनावर परतावा ठरवू, अशी भूमिका घेतली आहे. पीक कापणीस अजून अवकाश असल्याने कंपनीचे वेळकाढू धोरण स्पष्ट होऊ लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT