Crop insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : अमरावतीतील चारच महसूल मंडलाना मिळणार अग्रिम विमा

Advance Crop Insurance : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या विमा कंपनीने चारच महसूल मंडळांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम देण्याचे मान्य केले आहे.

Team Agrowon

Amravati News : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या विमा कंपनीने चारच महसूल मंडळांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अग्रिम देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे कृषी विभागाने केलेले ३७ महसूल मंडलांतील दावे मान्य करून घेण्यासाठी पुन्हा लढाई लढण्याची वेळ आली आहे.

अंजनगावसुर्जी तालुक्यातील चार महसूल मंडलांतील १० हजार २६६ शेतकऱ्यांना ८.६७ कोटी रुपये अग्रिम मिळणार आहे. ऑगस्टमध्ये पावसाने खंड दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात चौदा तालुक्यांतील ४१ महसूल मंडळांत नुकसान झाल्याचे पंचनामे केलेत.

कृषी विभागासह विमा कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी प्रतिनिधी यांच्या संयुक्त पाहणीनुसार अपेक्षित उत्पादन हे त्या पिकाच्या मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आल्याने ४१ महसूल मंडलांतील शेतकरी नुकसानभरपाईस पात्र ठरविण्यात आले.

त्यानुसार या महसूल मंडलांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा परताव्याच्या पंचवीस टक्के अग्रिम देण्यात यावा, अशी अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबरला काढली. त्यास विमा कंपनीने जिल्हास्तरीय व नंतर विभागस्तरीय समितीकडे आक्षेप नोंदवत आव्हान दिले.

दोन्ही समितींनी विमा कंपनीचे आक्षेप फेटाळत चौदाही महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना अग्रिम देण्याचा कृषी विभागास मान्य केले. मात्र उर्वरित ३७ महसूल मंडलांसाठी विमा कंपनीने या निर्णयाविरुद्ध आता आयुक्तालयाकडे आक्षेप नोंदवत वेळकाढू धोरण अवलंबले असल्याचा आरोप होत आहे.

या चार मंडलाना मिळणार अग्रिम

विमा कंपनीने कृषी विभागाचा दावा अमान्य करीत जिल्ह्यातील केवळ चारच महसूल मंडल अग्रीमसाठी पात्र ठरत असल्याचे मान्य केले आहे. ही चार महसूल मंडले अंजनगावसुर्जी तालुक्यातील असून त्यामध्ये सातेगाव, कोकर्डा, विहिगाव, कापूसतळणी या महसूल मंडळांचा समावेश आहे. या महसूल मंडलातील १० हजार २६६ शेतकऱ्यांना विमा अग्रिम देण्यासाठी विमा कंपनीने पात्र ठरविले आहे. या शेतकऱ्यांना ८.६७ कोटी रुपये अग्रिम मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT