Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Loan : सांगली जिल्ह्यात रब्बीचे केवळ अकरा टक्के कर्ज वितरण

Rabi Season : जिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज वितरण सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात रब्बी हंगामात कर्ज वितरण सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. या दोन महिन्यांत, अर्थात नोव्हेंबरअखेर ८ हजार ६५० शेतकऱ्यांना १४८ कोटी ९८ लाखांचे कर्ज वितरण केले आहे. कर्ज वितरणाची टक्केवारी केवळ ११ टक्के इतकी असून, या हंगामात राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात १ लाख १७ हजार ९४४ शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट १२६० कोटी इतके आहे. ऑक्टोबर महिन्यापासून रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरणास सुरू होते. जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी अंतिम टप्प्याकडे आली आहे. मात्र बॅंकांकडून कर्ज वितरणाची गती फारशी नसल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन महिन्यांत ८ हजार ६५० शेतकऱ्यांना १४८ कोटी ९८ लाखांचे कर्ज वितरण केले आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंकेने ४ हजार १६१ शेतकऱ्यांना ८५ लाख ५२ हजार म्हणजे २४.५६ टक्क्यांचे कर्ज वितरण केले आहे. खरीप आणि रब्बी हंगामात प्रत्येकवेळी राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंका कर्जवाटपामध्ये हात आखडता असतो.

मात्र यंदा रब्बी हंगामात राष्ट्रीयीकृत, व्यापारी बॅंकेने कर्जवाटपात आघाडी घेतली आहे. सांगली जिल्हा बॅंक, खासगी बॅंका आणि ग्रामीण बॅंकाकडून कर्ज वितरण सुरू असले तरी, या बॅंकाकडून कर्ज वितरणाची टक्केवारी कमी आहे. वास्तविक पाहता, जिल्हा बॅंकेकडून कर्जवाटप सर्वाधिक केले जाते. जिल्हा बॅंकेला ७०६ कोटी १४ लाखांचे उद्दिष्ट आहे.

त्यापैकी ३ हजार ६६६ शेतकऱ्यांना ३३ लाख १९ हजारांचे कर्ज वितरण केले आहे. परंतु यंदाच्या रब्बी हंगामात जिल्हा बॅंकेने कर्ज वाटपात काहीसा हात आखडता घेतला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्हा बॅंक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

रब्बी हंगामात कर्ज वितरणाची मुदत मार्चअखेर असते. त्यामुळे कर्ज वितरणास चार महिन्यांचा कालावधी आहे. यंदाच्या रब्बी हंगामात ८० टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज वितरण होईल, असा अंदाज संबंधित विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT