Tur  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Nafed Registration : ‘नाफेड’कडे केवळ ८७ शेतकऱ्यांची नोंदणी

Tur Registration Update : उडीद, सोयाबीननंतर सहकार विभागाने तूर नोंदणीसाठी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत केवळ ८७ शेतकऱ्यांची नोंदणी नाफेडकडे झाली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : उडीद, सोयाबीननंतर सहकार विभागाने तूर नोंदणीसाठी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत केवळ ८७ शेतकऱ्यांची नोंदणी नाफेडकडे झाली आहे. दराच्या तफावतीमुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीकडे पाठ फिरविली आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमीभावाने तूर खरेदीसाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने प्रक्रिया सुरू केली आहे. हमीभाव केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ व दि विदर्भ सहकारी पणन महासंघाने सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दर मिळू नयेत, यासाठी शासनाने नोंदणी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करावी लागणार आहे.

सध्या बाजारातील दर पाहता शेतकरी नोंदणी करण्यासाठी पुढे आलेले नाही. नाफेडच्या हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. आत्तापर्यंत केवळ तीनच केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. दिग्रस केंद्रावर ४३, महागाव १४ तर पांढरकवडा केंद्रावर ३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. कापसाचे दर आधारभूत किमतीपेक्षा कमी झाले आहेत.

असे असतानाही शासनाकडून कापसाच्या दराबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही. तशीच स्थिती आता तुरीबाबत दिसून येत आहे. तुरीचे दर कसे राहतील, याबाबत तज्ज्ञांची अनेक मते आहेत. खासगी बाजारात तुरीला चांगले दर मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच सध्या तरी शेतकरी नोंदणी करण्याच्या मानसिकतेत नसल्याचे दिसून येत आहे.

खासगी बाजारात तूर विकल्यास शेतकऱ्यांना तत्काळ पैसे मिळते. त्यामुळेच शासकीय खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. तूर अद्याप बाजारात आलेली नाही. मात्र, आत्तापासून तुरीच्या दरावरून वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहे. काहींच्या मते तुरीचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भावातील चढउतार पाहता शेतकरी यावर लक्ष ठेवून आहेत.

शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा

सध्या खासगी बाजारात कापूस तसेच सोयाबीनचे दर कोसळले आहेत. हमीभावापेक्षा कमी दर दोन्ही पिकांना मिळत आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणलेला नाही. शेतमालाचे दर वाढतील, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. त्यामुळे तुरीच्या दराकडे शेतकरी लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT