Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात ५० टक्केच पेरणी

Kharif Season : जमिनीतील ओली पिकांची उगवण चांगली असून, सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पाऊस दमदार झाल्याने या खरीप हंगामात पेरणीची कामे लवकर सुरू झाली. जिल्ह्यात आतापर्यंत ५० टक्के पेरणीची कामे उरकली असून, पिकात सर्वाधिक सोयाबीन पिकांचा पेरा झाला आहे. जमिनीतील ओली पिकांची उगवण चांगली असून, सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्‍ह्यात खरीप हंगामातील पेरणीची कामे सध्या सुरू आहेत. मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागांत झाल्याने मशागतीची कामे वेळेत सुरू झाली होती. जूनच्या सुरुवातीस पाऊस झाल्याने पेरणीस पोषक वातावरण झाले. यामुळे पेरणीची कामांना गती आली आहे. खरीप हंगामात कृषी विभागाकडून दोन लाख ८८ हजार ४९४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र निश्‍चित केले आहे.

त्यापैकी एक लाख ४४ हजार ९४४ हेक्टर म्हणजेच ५० टक्के क्षेत्रावर पेरणीची कामे उरकली आहेत. यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पेरा झाला आहे. सोयाबीनचे ७४ हजार ८०० हेक्टर क्षैत्रापैकी ६० हजार ५९३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी २३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

भाताची ४३ हजार ९७८ हेक्टर सर्वसाधारण क्षैत्रापैकी १६ हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. भुईमूग करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून भुईमुगाचे २९ हजार ४३५ सर्वसाधारण क्षैत्रापैकी २० हजार ७८४ हेक्टर क्षैत्रावर लागवड झाली आहे.

खरीप ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिकांची लागवड झाली आहे. झालेल्या पावसाच्या ओलीवर पिकांची उगवण झाली आहे. मात्र सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा चिंतेत भर पडली आहे. पिकांची उगवण व वाढ होण्यासाठी दमदार पावसाची प्रतिक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT