Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १५ लाख ९ हजार ९११ हेक्टरवर म्हणजे ३० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. मराठवाड्यात पावसाच्या आगमनानुसार भागनिहाय पेरणीची गती कमी अधिक होते आहे.
मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ४९ लाख ७२ हजार ७२९ हेक्टर क्षेत्रामध्ये १४ लाख ७९ हजार ५३६ हेक्टर कपाशी, २३ लाख २४ हजार १५० हेक्टर गळीतधान्य, ७ लाख ३८ हजार ३०३ हेक्टरवरील कडधान्य तर ४ लाख ३० हजार ७३९ हेक्टरवरील खरीप तृणधान्याचा समावेश आहे.
प्रस्तावित करण्यात आलेल्या या पिकनिहाय क्षेत्रानुसार सर्वसाधारण ४९ लाख ७२ हजार ७२९ हेक्टर क्षेत्रापैकी १५ लाख ९ हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राचा तुलनेत ३०.३६ टक्के इतकी आहे.
पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये ४ लाख ८२ हजार ५१० हेक्टर क्षेत्रावर कपाशी, ७ लाख ३४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ४७ हजार ८७९ हेक्टरवर उडीद,२७ हजार ९७९ हेक्टरवर मूग, ९८ हजार ७५५ हेक्टरवर तूर, ९८ हजार ८९१ हेक्टरवर मका, ११३३४ हेक्टरवर बाजरी, ४३१३ खरीप ज्वारी,३७ हेक्टरवर भात २८४३ हेक्टरवर खरीप भुईमूग, ३४२ हेक्टरवर तीळ, ८६ हेक्टरवर कारळ, ७२ हेक्टरवर इतर गळीत धान्य पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
धाराशिवमध्ये सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वात कमी पेरणी
पेरणीचा टक्का लक्षात घेता मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राचे तुलनेत धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४६.६८ टक्के पेरणी आटोपली आहे. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ११.३३ टक्के पेरणी झाली आहे.
इतर जिल्ह्याच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पेरणीचा टक्का लक्षात घेता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३४.३९ टक्के, जालन्यात ३०.३६ टक्के, बीडमध्ये २३.७२ टक्के, लातूरमध्ये २९.६७ टक्के, नांदेडमध्ये ३३.५० टक्के, परभणीत २९.२३ टक्के सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पेरणी आटोपली असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. पेरणीचा कमी अधिक टक्का पावसाच्या लहरीपणाचा परिचय देतो आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.