Tur Market Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement: बारामती बाजार समितीत तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू!

Baramati Market: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी निघत आहेत. त्यामुळे समितीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावात तुरीचे दर हमीभावापेक्षा कमी निघत आहेत. त्यामुळे समितीने केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहे. बारामती बाजार समितीत तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी २४ जानेवारीपासून सुरू आहे. तरी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन सभापती विश्वास आटोळे यांनी केले.

बाजार समितीने तूर खरेदीसाठी नोंदणीसाठीचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या पीएसएस योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याबाबत दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. पुणे यांनी कळविलेले आहे. तरी २४ जानेवारीपासून ३० दिवसांपर्यंत म्हणजे २२ फेब्रुवारीपर्यंत तूर उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.

केंद्र शासनाने तुरीचा हमीदर ७५५० रुपये निश्चित केला असल्याने याच दराने वाळवलेली व स्वच्छ केलेली तूर खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावयाची आहे.

शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंद करण्यासाठी जमिनीचा सातबारा उतारा व त्यावर तुरीची नोंद असलेला सन २०२४-२५ पीकपेरा, आठ-अ, आधारकार्ड आणि आयएफएससी कोडसह बँकेचे पासबुक झेरॉक्स, मोबाइल नंबर इत्यादी संपूर्ण कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या मुदतीनुसार शेतकऱ्यांनी बाबालाल काकडे निरा कॅनॉल संघ, तीन हत्ती चौक बारामती येथे नाव ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे.

तसेच अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी निरा संघाचे प्रशांत मदने ८८८८८६७९२५ व बारामती बाजार समितीचे सूर्यकांत मोरे ९९७०३४०४१२ यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येणार असल्याने मुदतीत नोंदणी करावी. खरेदी सुरू झाल्यानंतर मुदतीत नोंद केलेल्या शेतकऱ्यांना एसएसएमद्वारे कळविण्यात येईल. त्यावेळी तूर खरेदी केंद्रावर तूर आणताना शासनाचे निकषा प्रमाणे एफएक्यू दर्जाची व स्वच्छ आणि वाळवून आणावी. तुरीची तपासणी करून तूर खरेदी करण्यात येईल, अशी माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT