Electricity Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Tariff : वीजदर निश्‍चितीकरणासाठी पुण्यात २७ ला जाहीर ई-सुनावणी

MSEDCL : महावितरण वीज कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या पंचवार्षिक वीज दरवाढीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे.

Team Agrowon

Pune News : एकूण महसूली गरज व प्रस्तावित वीजदराच्या निश्‍चितीकरणासाठी महावितरण कंपनीने दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या वतीने गुरुवारी (ता. २७) पुणे येथील महाराष्ट्र शासकीय तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (सीओइपी) मुख्य सभागृहात (ई-सुविधा केंद्रात) जाहीर ई- सुनावणी होणार आहे. या सुनावणीला सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण कंपनी) आर्थिक वर्ष २०२२-२३ व आर्थिक वर्ष २०२३-२४ चे अंतिम अचूक समायोजन, आर्थिक वर्ष २०२४-२५ चे तात्पुरते समायोजन व आर्थिक वर्ष २०२५-२६ ते आर्थिक वर्ष २०२९-३० या पाचव्या नियंत्रण कालावधीसाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमोर दाखल केलेल्या बहुवर्षीय वीजदर याचिकेवर ही जाहीर ई-सुनावणी होणार आहे.

महावितरण वीज कंपनीने राज्य नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या पंचवार्षिक वीज दरवाढीसाठी प्रस्ताव दाखल केला आहे.

या प्रस्तावित वीजदर वाढीसाठी नागरिकांकडून हरकती आणि तक्रारी नोंदविण्याचे आवाहन www.merc.gov.in या संकेतस्थळावर एक फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. त्याची १७ फेब्रुवारी हा अंतिम मुदत होती. परंतु हे संकेतस्थळ बंद राहिल्यामुळे अनेकांना हरकती घेता न आल्याने एक दिवसाची मुदत वाढ देण्यात आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT