Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांदा खरेदीसाठी होतकरू व्यापाऱ्यांना परवानगी

सिन्नर बाजार समितीच्या वतीने नायगाव उपबाजार आवारात २००६ पासून कांदा शेतीमालाचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत.

Team Agrowon

Nashik onion Rate : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Sinnar Agricultural Produce Market Committee) नायगाव उपबाजार आवारात कांदा खरेदी-विक्री केली जाते.

येथे इच्छुक नवीन होतकरू व्यापाऱ्यांना कांदा (Onion) खरेदीचा व्यवसाय करण्यासाठी सिन्नर बाजार समितीकडून पुढील वर्ष २०२३-२४ साठी परवानगी देण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया बाजार समितीने सुरू केली आहे.

सिन्नर बाजार समितीच्या वतीने नायगाव उपबाजार आवारात २००६ पासून कांदा शेतीमालाचे लिलाव सुरू करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत लाल कांद्याचा मोठ्या प्रमाणात हंगाम सुरू झालेला असल्याने बाजार आवाराच्या २० किलोमीटर परिसरात मोठ्या प्रमाणात आवक आहे;

मात्र येथे होतकरू व्यापाऱ्यांची संख्या नसल्याने नायगाव येथे बाजार समितीने कांदा खरेदीदार व्यापारी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

समितीकडे उपबाजाराच्या आवारात मोठ्या प्रमाणावर जागा व नव्याने बांधलेला प्रशस्त शेड असल्याने इच्छुक व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी प्लॉटदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ज्या व्यापाऱ्यांना नायगाव उपबाजार आवारात कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू करावयाचा आहे, त्यांनी बाजार समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक एकनाथ पाटील व सचिव विजय विखे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT