Onion Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Procurement : ‘नाफेड’साठी कांदा खरेदी बाजार समितीतूनच व्हावी

Market Update : ‘नाफेड’ची खरेदी शंका कुशंकांच्या गर्तेत सापडली असतानाच कामातील गैरप्रकार खुद्द ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या समोर आले आहेत.

Team Agrowon

Nashik News : ‘नाफेड’ची खरेदी शंका कुशंकांच्या गर्तेत सापडली असतानाच कामातील गैरप्रकार खुद्द ‘नाफेड’चे अध्यक्ष जेठाभाई अहिर यांच्या समोर आले आहेत. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी महासंघांच्या काही खरेदी केंद्रावर नियम डावलून काम होत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

त्यामुळे ‘नाफेड’च्या माध्यमातून होणाऱ्या खरेदीवर शेतकरी नाराज असून ही खरेदी ‘नाफेड’ने बाजार समितीच्या माध्यमातून करावी, अशा मागणी नाफेडचे पश्चिम विभाग संचालक केदा आहेर व चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी अहिर यांच्याकडे केली आहे

अहिर यांनी गुरुवारी (ता. २०) नाशिक कांदा खेरदी केंद्रावर भेट दिली. नाफेडच्या कांदा खरेदीची माहिती जाणून घेत त्यामधील त्रुटी समजून घेण्याकरिता आणि चुकीचे कामकाज करणाऱ्या महासंघ व संस्थांवर कारवाई करण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला आहे.

नाफेडची खरेदी सुरू होऊन महिना उलटत आला तरीही पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी झालेला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरू असलेली कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधून करावी, जेणेकरून त्या ठिकाणी स्पर्धा होईल.

शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील आणि ज्या उद्देशाने शासनाने ही खरेदी सुरू केलेली आहे तो उद्देशही सफल होईल. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे तत्काळ डीबीटीअंतर्गत खात्यावर वर्ग करण्यात यावेत, भविष्यात ही खरेदी सभासद संस्थांकडून व विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून गावोगावी सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात चढ-उतार, झेंडू बाजारात तेजीत, टोमॅटो बाजारात चढ-उतार , केळी बाजारात तेजी, डाळिंब आवकेत घट

Lift Irrigation : उपसा सिंचनच्या पाणीवापरासाठीचे दर निश्चित

Manoj Jarange Patil Protest: मी मुंबईला एकटाच निघणार, योग्यवेळी तुम्हाला बोलवेन; मनोज जरांगेंचा निर्णय

Water Crisis Management : संभाव्य टंचाईसाठी काटेकोर तयारी करा

Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार; पुढील ५ दिवसांचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT