Onion Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Production : टेंभुर्णीत कांदा बियाण्यांचे पीक बहरात

मागील काळात कांदा बियाण्यांचा दर लाखापेक्षाही जास्त झाला होता, यामुळे मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्यांची लागवड करण्यात आली.

Team Agrowon

Onion Seed Production News टेंभुर्णी : पारंपरिक शेती पद्धतीला (Traditional Agriculture) फाटा देत येथील नारायण जोशी या युवा शेतकऱ्याने एक एकर शेतात कांदा बियाण्यांची लागवड (Onion Seed Cultivation) केली. सद्यःस्थितीत हे पीक फुलोऱ्यात आहे.

मागील काळात कांदा बियाण्यांचा दर लाखापेक्षाही जास्त झाला होता, यामुळे मध्यंतरी मोठ्या प्रमाणावर कांदा बियाण्यांची लागवड करण्यात आली.

दरम्यान, गतवर्षी कांदा बियाणांचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी कांदा बियाणे घेण्याचे टाळले, परंतु येथील युवा शेतकरी नारायण जोशी यांनी एक एकर शेतात दहा क्विंटल कांद्याची लागवड करून बियाणे घेण्याचे नियोजन केले.

यासाठी बेड पद्धतीचा वापर करीत संपूर्ण लागवडीसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. खत व फवारणीचे नियोजन करून त्यांनी योग्य पद्धतीने पिकाची काळजी घेतली.

शेतशिवारात मधमाश्यांची वाढलेली संख्या परागीभवनासाठी पोषक आहे. सद्यःस्थितीत बियाण्यांचे पीक फुलोऱ्यात आहे.

यातून आपल्याला जवळपास तीन क्विंटल कांदा बियाणे मिळेल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला दरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक खते फवारणी यासाठी किमान ७० हजार रुपये खर्च लागवडीपासून काढणीपर्यंत होईल, असे त्यांनी सांगितले. यातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कांदा बियाण्याच्या परागीभवनासाठी आवश्यक असलेल्या मधमाश्यांची संख्या दोन वर्षांपूर्वी घटली होती, परिणामी उत्पादन घटले होते दरम्यान यंदा परिसरात पाऊस चांगला असल्याने मधमाश्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे परागीभवन प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर होऊन उत्पादन वाढेल .
नारायण जोशी, शेतकरी, टेंभुर्णी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात कर्जमाफीचे ५ हजार ८६ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जखात्यावर वितरीत

Wild Vegetable Conservation: रानभाज्यांच्या बियाणे बँकेसाठी प्रयत्न करा : प्रसाद

Fake Agricultural Products: नामवंत कंपनीच्या नावाने बनावट पोषकविक्री रॅकेटचा पर्दाफाश

Agrowon Podcast: तुरीच्या दरात चढ-उतार, हळदीच्या भावात बदल, वांगी दरात घसरण, पालकचे भाव टिकून तर संत्री दरात वाढ

International Agriculture Workshop: युवा शेतकरी प्रताप मारोडे यांची आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी निवड

SCROLL FOR NEXT