Onion seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Production : जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी होणार

Seed Production Program : २०२१, २०२२ मध्ये कांदा बिजोत्पादन क्षेत्र जिल्ह्यात दोन हजार हेक्टरपर्यंत होते. कांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले होते.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे दीड हजार हेक्टरवर होणार आहे. काही भागात आागाप लागवड झाली आहे. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांची हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे. पण कांदा दर अनिश्चित आहेत. यामुळे क्षेत्र कमी राहील, असे दिसत आहे.

२०२१, २०२२ मध्ये कांदा बिजोत्पादन क्षेत्र जिल्ह्यात दोन हजार हेक्टरपर्यंत होते. कांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले होते. कांदा बीजोत्पादनासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. करार करून घेतले आहेत. त्यात विविध दरांत कांद्याचा किंवा कांदा बल्बचा पुरवठा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कंपन्यांनी केला.

तसेच खरेदीची हमी दिली आहे. दरही लागवडीपूर्वी ठरवून घेतले आहेत. पण कांद्याचा बाजार अस्थिर आहे. नैसर्गिक समस्या असल्यामुळे कांदा बीजोत्पादनासंबंधीचे कमी होत आहे. यंदा लागवड सुमारे २०० ते ३०० हेक्टरने कमी होईल, असा अंदाज आहे.

कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागात चांगला प्रतिसाद मिळत असतो. पण या भागात शेतकरी यंदा फारसे स्वारस्य दाखवीत नसल्याचे चित्र आहे.

कांदा बीजोत्पादनासंबंधी प्रतिकिलो ४०० ते ५०० रुपये दर खरेदीदारांनी ठरविले आहेत. यात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील दिली आहे. तसेच खरेदी थेट जागेवर करण्याचे आश्वासन दिले आहे.

काही खरेदीदारांनी खते, फवारणीसाठीची कीडनाशकेदेखील पुरविण्याची तयारी दाखविली. हा खर्च सुरुवातीला कंपन्या करतील. नंतर हा खर्च कपात केला जाईल. सद्यःस्थितीत कांदा बीजोत्पादनासंबंधीची लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली. लागवडीसाठी लाल कांद्याचा सर्वाधिक उपयोग झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT