Onion Seed Production Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Production : जळगाव जिल्ह्यात कांदा बीजोत्पादन क्षेत्र यंदा कमी

Onion Cultivation : यंदा लागवड सुमारे २०० ते ३०० हेक्टरने कमी झाल्याची माहिती आहे. कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागांत चांगला प्रतिसाद यंदा मिळाला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे दीड हजार हेक्टरवर झाली होती. काही भागात आगाप लागवड झाली. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दराची हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे. पण कांदा दर अनिश्चित आहेत. यामुळे क्षेत्र कमी राहिले.

२०२३-२०२४ मध्ये कांदा बीजोत्पादन क्षेत्र जिल्ह्यात दोन हजार हेक्टरपर्यंत होते. कांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले होते. कांदा बीजोत्पादनासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

करार करून घेतले. त्यात विविध दरांत कांद्याचा किंवा कांदा बल्बचा पुरवठा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कंपन्यांनी केला. तसेच खरेदीची हमी दिली आहे. दरही लागवडीपूर्वी ठरवून घेतले आहेत. पण कांद्याचा बाजार अस्थिर आहे. नैसर्गिक समस्या असल्यामुळे कांदा बीजोत्पादनासंबंधीचे कमी झाले आहे.

यंदा लागवड सुमारे २०० ते ३०० हेक्टरने कमी झाल्याची माहिती आहे. कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागांत चांगला प्रतिसाद यंदा मिळाला नाही.

कांदा बीजोत्पादनासंबंधी विविध दर खरेदीदारांनी ठरविले आहेत. बीजोत्पादनात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील दिली होती. खरेदी थेट जागेवर करण्याचे आश्वासन दिले आहे. पण यंदा बीजोत्पादन क्षेत्रात घट झाल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT