Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : निर्यातबंदीनंतर कांद्याचे दर निम्म्याने घसरले

Onion Rate : किरकोळ बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : किरकोळ बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीबंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयाचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. कांद्यावर निर्यातबंदी घातल्यापासून घाऊक बाजारातील कांद्याचे दर सातत्याने घसरत आहेत. परिणामी किरकोळ बाजारातील कांद्याच्या दरावरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दर अजून घसरण्याचा अंदाज

कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या सरासरी घाऊक दर घसरले आहेत. बाजारातील कांद्याचे दर जवळपास १० टक्क्यांनी घसरल्याचे चित्र आहे. तसेच येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोमवारी २१०० रुपये प्रति क्विंटल विकला जाणाऱ्या कांद्याचे दर शुक्रवारपर्यंत १८०० ते १९०० रुपयांपर्यंत खाली आले. कांद्याच्या दरातील घसरणीचा कल यापुढेही असाच कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे आधीच संकटात सापलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मागणीही घटली

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्यानंतर सातत्याने दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या १५ दिवसांत कांद्याचे दर ५० टक्क्यांनी घसरले आहेत. निर्यातबंदीच्या निर्णयानंतर ७ डिसेंबरपासून दरामध्ये घसरणीचा कल दिसायला सुरूवात झाली. ६ डिसेंबररोजी कांद्याचा सरासरी घाऊक दर ३९०० रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला होता.

दरम्यान, निर्यातबंदीच्या घोषणेमुळे कांद्याची मागणीही घटली आहे. कांद्याच्या आवकेत मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ऐन काढणीवेळी झालेल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटले आहे. त्यातच निर्यातबंदीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष पाहायला मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT