Onion Market
Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांदा दरात क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत सुधारणा

Team Agrowon

Apmc Onion Market : निर्यातक्षम कांदा दरात मागील दोन दिवसांपासून १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसली. पण सध्या बाजारात प्रमाण जास्त असलेल्या सरासरी किंवा कमी गुणवत्तेच्या कांद्याचे भाव स्थिर दिसतात. बांगलादेशने कांदा आयातीला परवानगी दिल्याचा फायदा भारतीय कांद्याला मिळू शकतो. त्यामुळे दरात सुधारणा दिसली, असे जाणकारांनी सांगितले.

बांगलादेशने कांदा आयातीवरील निर्बंध काढल्यानंतर देशातील कांदा बाजारात काहीसे चैतन्य दिसले. अनेक बाजारांमध्ये निर्यातक्षम कांद्याच्या भावात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसली. बांगलादेश भारतीय कांद्याचा मोठा ग्राहक आहे. भारतात सरसकट निर्यातक्षम गुणवत्तापूर्ण मालाचे उत्पादन होत नाही. भारतातून गुणवत्तापूर्ण कांदा निर्यात विकसित देशांना होत असते. तर कमी गुणवत्तेच्या कांद्याचे मुख्य ग्राहक बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळ हे देश आहेत. त्यापैकी बांगलादेशने भारतीय कांद्यावर निर्बंध घातले होते.

भारत सरकारने गेल्या काही वर्षांपासून कांदा निर्यातीबाबत धरसोडीचे धोरण राबवले. त्यामुळे बांगलादेशने देशातच कांदा उत्पादन वाढवले. तसेच इतर देशांकडून आयात करण्यास सुरुवात केली. पण यंदा बांगलादेशमध्ये कांद्याचा तुटवडा आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयातीस परवानगी दिली. याचा फायदा भारतीय कांदा बाजाराला होऊ शकतो.

कांद्याचे भाव सध्या उत्पादन खर्चापेक्षा कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यंदा कांदा उत्पादनाला मोठा फटका बसला. तर कांद्याची टिकवणक्षमताही कमी झाली. एरवी पाच ते सहा महीने कांदा टिकत होता. पण यंदा बहुतांशी कांद्याची टिकवणक्षमता ३ महीन्यांपेक्षा जास्त नसेल. पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा कांद्यावर परिणाम झाला. परिणामी हंगामाच्या शेवटी कांद्याची टंचाई जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बाजारात येणाऱ्या कांद्याची गुणवत्ता हळूहळू चांगली येत आहे. तर दुसरीकडे आवकेचा दबावही कमी होताना दिसतोय. परिणामी पुढील काळात आवक आणखी कमी होऊ शकते. त्यातच बांगलादेशने कांदा आयातीवर निर्बंध काढले. यामुळे निर्यातीला गती मिळू शकते. नाफेडही तीन लाख कांदा खरेदी करणार आहे. या बाजू कांदा बाजाराला आधार देऊ शकतात. मागील तीन दिवसांमध्ये दरात काहीशी सुधारणा दिसली. पण कांदा दराची सरासरी दरपातळी ८०० ते १ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान कायम होती.

बाजारावरील कांदा आवकेच्या लोंढ्यामुळे शिल्लक मालही कमी झाला. त्यामुळे पुढील काळात कांदा बाजाराला चांगला आधार मिळू शकतो. दोन महिन्यानंतर बाजारातील कांदा आवक कमी दिसू शकते. तर ऑक्टोबरपासून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहू शकतो. त्यामुळे कांदा भावात चांगली सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT