Onion Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांदा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी

Onion Market : नव्या कांद्याला जळगाव बाजार समितीमध्ये गेले तीन - चार दिवस प्रतिक्विंटल कमाल २२०० व किमान ८०० रुपये दर मिळाला आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात नव्या हंगामातील कांद्याची आवक अत्यल्प आहे. पण दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक परवडत नसल्याची स्थिती आहे. नव्या कांद्याला जळगाव बाजार समितीमध्ये गेले तीन - चार दिवस प्रतिक्विंटल कमाल २२०० व किमान ८०० रुपये दर मिळाला आहे.

दर किमान चार हजार रुपये प्रतिक्विंटल नव्या कांद्याला अपेक्षित आहे. खरिपातील कांद्याची मोठी हानी झाली. त्या वेळेस कांद्यावर शेतकऱ्यांना पिकात रोटाव्हेटर फिरवावा लागला. जळगाव बाजारात नव्या हंगामातील लाल कांद्याची सध्या ६०० क्विंटलवर आवक होत आहे. तर मागील उन्हाळ कांद्याची किंवा चाळीत साठविलेल्या सुमारे १५० क्विंटल आवक झाली.

उन्हाळ कांद्याची आवक कमी होत आहे. नव्या कांद्याची आवक वाढत आहे. नव्या हंगामातील कांद्याचा वापर बीजोत्पादनात अधिक केला जातो. त्यासाठी दर्जेदार कांदा आवश्यक असतो. निर्यातबंदी व इतर अडचणी यामुळे कांद्याचे दर वधारत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सध्या नव्या कांद्याची काढणी जळगाव जिल्ह्यात सुरू आहे.

चोपडा, धरणगाव, एऱंडोलात काढणी सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी योग्य नियोजन, प्रतिबंधात्मक उपाययोजना करून उत्पादन बऱ्यापैकी मिळविले आहे. त्यासाठी एकरी किमान २५ हजार रुपये खर्च आला आहे. पण उत्पादन व दर लक्षात घेता तोटा येईल, अशी स्थिती आहे.

कारण उत्पादन एकरी ३० क्विंटलदेखील आलेले नाही. तसेच दर अस्थिर आहेत. शेतकरी कमी दरांमुळे नाराज आहेत. शिवाय तागाची गोणी, वाहतूक खर्च यात मोठा निधीही लागत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT