Onion Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Harvesting : कांदा काढणीच्या कामाला वेग

Onion Production : बहुतांश ठिकाणी कांदा काढणी पूर्ण झालेली असून, कांदा शेतातच अरणी करून साठविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नरच्या पश्चिम भागात कांदा काढणीच्या कामांना सध्या वेग आला आहे. यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने कांद्याच्या फुगवणीवर विपरीत परिणाम झाल्याचे कुसूर (ता. जुन्नर) येथील शेतकरी महेंद्र भगत यांनी सांगितले.

बहुतांश ठिकाणी कांदा काढणी पूर्ण झालेली असून, कांदा शेतातच अरणी करून साठविल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र सध्या कांद्याला समाधानकारक बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. काढणी केलेला कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येत आहे.

जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते. कांदा हे शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे पीक असल्याने त्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून असतात.

कांदा रोप उपलब्ध करण्यापासून ते लागवड, खुरपणी, भरणी, औषधे फवारणी, आदींपासून ते काढणीपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची भांडवली गुंतवणूक होते. त्यातच समाधानकारक बाजारभाव मिळाला नाहीतर भांडवलही सुटत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

कांद्याला हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, सध्या पाण्याची टंचाई लवकरच जाणवल्यामुळे अनेक ठिकाणी कांद्याला पुरेसे पाणी देता न आल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT