Onion Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Harvesting : कमी दर, ढगाळ वातावरणामुळे शिवारात कांदा काढणीला वेग

Onion Crop : खानदेशात ढगाळ वातावरण गेले काही दिवस कायम आहे. तसेच दरही कमी होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, शेतीकामांमध्ये कांदा काढणी वेगात सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ढगाळ वातावरण गेले काही दिवस कायम आहे. तसेच दरही कमी होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी धसका घेतला असून, शेतीकामांमध्ये कांदा काढणी वेगात सुरू आहे. बाजारात आवकही वेगात होत आहे.

आवक काहीशी वाढल्याने बाजारात कांद्याचे दर कमी होत आहेत. लाल कांद्याची अधिकची आवक खानदेशात गेल्या आठवड्याच्या कमी होती. परंतु गेल्या शुक्रवारी (ता. १५) आवक काहीशी वाढली. कांद्याचे दर कमाल २२०० रुपये प्रतिक्विंटल, तर किमान ८०० रुपये असे झाले आहेत.

सध्या आवक जळगाव, धुळे, चाळीसगाव (जि. जळगाव) येथील बाजारात आहे. ही आवक या आठवड्यात वाढली आहे. यातच ढगाळ, प्रतिकूल वातावरणामुळे कांदा काढणी वेगात सुरू आहे. कारण पाऊस आल्यास दर आणखी कमी मिळतील. मजूर काढणीसाठी बाहेर गावातून आणले जात आहेत. कारण दर कमी होण्याची भीती अधिक आहे.

अधूनमधून वेगाचा वारा सुटत आहे. सूर्यदर्शन खानदेशात गेले काही दिवस व्यवस्थितपणे होत नसल्याची स्थिती आहे. सकाळपासून ढग व सुसाट वारा असतो. यामुळे काढणीचे काम करतानाही धावपळ होते. लेट खरीप किंवा उशिराच्या खरिपातील कांद्याची लागवड खानदेशात अधिक झाली होती. या कांद्याचे दर २० ते २२ दिवसांपूर्वी बऱ्यापैकी होते. परंतु दरात काही दिवसांत सतत घट झाली आहे.

बाजारातही याचा परिणाम दिसत असून, जळगाव येथील बाजारातील आवक ३०० क्विंटलने वाढली आहे. काढणीनंतर लागलीच शेतकरी विक्री करीत आ हेत. कारण सध्या वातावरण अस्थिर आहे. जळगावच्या बाजारात मागील शनिवारी (ता. १६) ६०० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. ती पुढे वाढेल, असे दिसत आहे.

धुळ्यातील आवकही वाढत आहे. तेथे शनिवारी व रविवारी (ता. १७) सरासरी ७६० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. चाळीसगाव, अडावद (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील बाजारातील आवकही बरी आहे. नवीन कांदा लागवडही सुरू आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड कमी करण्याचे नियोजन केले आहे. लागवडीसाठी अनुकूल स्थिती नाही. ढगाळ वातावरण व नोव्हेंबरमधील पावसाने कोवळ्या कांदा रोपांवरही रोगराई दिसत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT