onion Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : आंबेगाव तालुक्यात कांदा लागवड वेगात

Onion Market : आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये सध्या कांदा लागवडीला वेग आला आहे.

Team Agrowon

Pune News : आंबेगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये सध्या कांदा लागवडीला वेग आला आहे. शेतात कांदा लागवडीसाठी मजुरांची कमतरता, पडलेले बाजारभाव आणि बदलत्या हवामानाचा सामना करीत तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

बदलत्या हवामानामुळे तसेच शेतीतील वाढलेल्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक मेटाकुटीला आला आहे. मजुरांची भरमसाट वाढलेली मजुरी, खतांच्या वाढलेल्या किमती आणि महावितरणचा चाललेला लपंडाव या समस्येने शेतकरी त्रस्त झाला आहे. या सर्व गोष्टींवर मात करून बळीराजा कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करीत आहे.

नारोडी येथील शेतकरी तुषार सुभाष हुले यांनी सांगितले, की कांद्याला गेल्या दोन -तीन वर्षांत पाहिजे तसा बाजारभाव मिळाला नाही. त्यातही कांद्याचे पैसे होतील की नाही याची खात्री नसताना देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करीत आहे.

त्यामध्ये परतीच्या पावसाने काद्यांच्या रोपांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यातच कांदा लागवड करताना मजूर उपलब्ध होत नाही. बाहेर गावावरून मजूर आणावे लागत आहे. गाडीभाडे व एका मजुराची मजुरी ३५० ते ४०० रुपये असून, एकरी ९००० ते १०००० रुपये खर्च येतो.

घोडेगावचे बाळासाहेब काळे म्हणाले, की गेली दहा वर्षे शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले आहे. हमीभाव तर नाहीच, पण मिळणाऱ्या बाजारभावावर सुद्धा निर्यात बंदी आणली जाते. कांदा, दूध, टोमॅटो, बटाटा या शेतकऱ्यांच्या रोजी रोटीच्या उत्पन्नावर सरकार घाला घालत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT