Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : ओतूर परिसरात कांदा लागवडीला वेग

Onion Farming Issue : लागवडी करण्यासाठी वीज, पाणी, कांदा रोप व महिला मजूर या सर्वांची सांगड घालताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

Team Agrowon

Junnar News : ओतूर (ता. जुन्नर) परिसरातील गावांमध्ये कांदा लागवड वेगात सुरू आहे. लागवडी करण्यासाठी वीज, पाणी, कांदा रोप व महिला मजूर या सर्वांची सांगड घालताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

लागवडीसाठी महिलांना सहाशे ते सातशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. एकरी कांदे लागवडीसाठी कमीत कमी १८ ते २० जणींची गरज लागते. त्यामुळे यावर्षी उत्पादनाचा खर्च वाढणार आहे.

पहिल्या टप्प्यात परतीच्या पावसामुळे काही भागातील कांदा रोपे वाया गेली आहेत. मात्र दुसऱ्या टप्प्यात असलेली मागास कांदा रोपे उपलब्ध होणार आहेत. तालुक्यातील एकूण कांदे लावगड क्षेत्रापैकी ७० टक्के कांदे लागवड क्षेत्र हे ओतूर कृषी मंडळ विभागात समाविष्ट होणाऱ्या ४१ गावांमध्ये होत आहे.

त्यात प्रामुख्याने ओतूर, उदापूर, डिंगोरे, रोहोकडी, चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, पिंपळगाव जोगा, नेतवड, माळवाडी, बल्लाळवाडी, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड, ठिकेकरवाडी या गावामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होते.

कांदा रोपांचा तुटवडा

परतीचा पावसामुळे काही भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी टाकलेली कांदा रोपे सडली तसेच वाहून गेल्याने वाया गेली असल्याने कांदा रोपाचा पहिल्या टप्प्यातील कांदा लागवडींमध्ये रोपाचा तुटवडा निर्माण झाला होता तसेच कांदा रोपाला चांगला भाव आला आहे. मात्र कित्येक शेतकऱ्यांनी परत कांदा रोपे टाकली असल्याने आता कांदा रोपे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे दिसत आहे.

उत्पादन खर्चात वाढ

यंदा कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना तारेवरील कसरतच करावी लागलात आहे. महिला मजूर, पाणी, कांदा रोपे, वीज या सर्वांची एकत्र सांगड घालून कांदे लागवड करताना भागातील शेतकऱ्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT