Commerce Minister Piyush Goyal and Agricultural Value Commission Chairman Pasha Patel Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Policy : कांदा, कापूस, सोयाबीन दराबाबत लवकरच धोरण

Agriculture Update : कांदा, कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ-उतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिले.

Team Agrowon

Pune News : कांदा, कापूस आणि सोयाबीन दराच्या चढ-उतारामुळे व्यथित झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिले.

कापूस, सोयाबीन आणि कांदा दरप्रश्‍नामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्‍वभूमीवर पटेल यांनी श्री. गोयल यांची गुरुवारी (ता. ११) नवी दिल्ली येथे भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव आणि श्री. गोयल आणि श्री. पटेल यांची बैठक घडवून आणली.

शेतीमालाचे आयात-निर्यात धोरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासमवेत बैठक घेऊन या विषयांवर ठोस निर्णय घेणार असल्याचे श्री. गोयल यांनी या वेळी स्पष्ट केले.येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठकही होईल.

महाराष्ट्रातील शेती प्रश्नांवर ही बैठक झाली. यात सर्व मुद्द्यांवर तपशीलवार चर्चा झाली. लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ.
पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT