Onion Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Conservation : लासलगाव येथे कांदा संवर्धन चाचणी यशस्वी

Onion Storage : रेडिएशनमुळे कांद्याचे आयुष्य वाढते. या साठी कांदा काढणीनंतर एक महिन्याच्या आत प्रक्रिया करावी लागते, यासाठी सहा ते सात महिने ठेवावे लागतात.

मुकूंद पिंगळे

Nashik News : ‘‘कांदा दराच्या स्थिरीकरणासाठी व कांदा संरक्षणासाठी ‘कृषक’चे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान हे कांदा उत्पादकासाठी क्रांतिकारक पाऊल आहे,’’ असे प्रतिपादन अणुऊर्जा विभागाचे सचिव व अध्यक्ष डॉ. अजितकुमार मोहंती यांनी लासलगाव येथे शुक्रवारी (ता. ८) आयोजित शेतकरी मेळाव्यात केले.

‘कृषक’आवारात झालेल्या या मेळाव्यास भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांच्यासह माजी संचालक डॉ. घंटी, फूड टेक्नॉलॉजीचे मुख्य डॉ. सत्येंद्र गौतम, अनुजा केंद्राच्या सह सचिव सुषमा शेटे, महाराष्ट्र राज्य कृषी अधिकारी बालकृष्ण सूर्यवंशी, ‘डायरेक्टर ऑफ इन्फ्रा कुल’चे संजय गुप्ता, प्रांताधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते.

मोहंती म्हणाले, ‘‘ ‘कृषक'मधील संवर्धन चाचण्या यशस्वी करणे हे अन्न संरक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.’’ शेटे म्हणाल्या,‘‘रेडिएशनमुळे कांद्याचे आयुष्य वाढते. या साठी कांदा काढणीनंतर एक महिन्याच्या आत प्रक्रिया करावी लागते, यासाठी सहा ते सात महिने ठेवावे लागतात. ही प्रक्रिया प्रामुख्याने खाद्यपदार्थसाठी उपयोगी आहे. आंब्यावर विकिरण प्रक्रिया केल्यानंतर अमेरिका व ऑस्ट्रेलिया या ठिकाणी पाठविला जातो.

त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. कांदा उत्पादकांसाठी पायलट प्रोजेक्ट ‘कृषक’मध्ये सुरू केला आहे. त्यात प्रायोगिक तत्त्वावर २५० टन कांदा मोफत प्रक्रिया करून मिळेल. यासाठी स्टोरेज खर्च प्रतिएक महिना एक किलो साठी एक रुपया व रेडिएशन खर्च एक रुपये व इतर खर्च असे साडेसहा रुपये खर्च येतो. या प्रक्रियेतून गेलेला कांदा शेतकऱ्यांचा हातात ९७ टक्के मिळतो.’’

‘कांदा संरक्षण हाच हेतू’

कांदा संरक्षणासाठी भाभा आणू संशोधन केंद्राच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे कांदा बाजार भावाच्या स्थिरतेसाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. लासलगाव येथे कृषी युनिटमध्ये ही चाचणी यशस्वी झाली.

त्यानंतर शेतकरी आणि शेतकरी उत्पादक संस्थांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेळावा घेण्यात आला. मंदीच्या काळात कांद्याची कमतरता, वजन कमी होणे, कुजणे, मोड येणे आदी समस्या टाळण्यासाठी विकिरण केलेले कांदे साडे सात महिने चांगल्या स्थितीत साठवू शकतो, असे या वेळी सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: गाळप हंगाम लवकर सुरु केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींची आंदोलनाची घोषणा, महाराष्ट्र- कर्नाटकातील संघटना एकवटल्या

Soybean Rate: देशातील उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता ?

Sugarcane Harvesting Workers: ऊसतोड मजुरांना मिळणार मूलभूत सुविधा; साखर कारखान्यांना सरकारचे कडक निर्देश

Silk Farming : रेशीम शेतीत उद्योजकतेच्या संधी

Farmers Demand: उसाला प्रति टन सहा हजार रुपये दराची मागणी

SCROLL FOR NEXT