Onion Production : खाणदेशात कांदा लागवड घटणार का ?

Team Agrowon

विषम वातावरणामुळे नुकसान

खानदेशात कांदा लागवड यंदा सुमारे ११ ते १२ हजार हेक्टरवर होऊ शकते, पण कांदा रोपवाटिकांचे सध्याच्या विषम वातावरणामुळे नुकसान होत आहे.

Onion Crop | Agrowon

रोपवाटिका वाचविण्याचे प्रयत्न

शेतकरी बुरशीनाशके, कीडनाशकांचा उपयोग करून रोपवाटिका वाचवीत आहेत. यामुळे पुढे कांदा लागवड कमी होईल, अशी स्थिती आहे.

Onion Crop | Agrowon

ढगाळ वातावरण

मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. पेरणीनंतर रोपवाटिकांमध्ये बियाण्याची उगवण बऱ्यापैकी झाली.

Onion Crop | Agrowon

कोरडे वातावरण

पण पाऊस, ढगाळ वातावरण अगदी नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून आहे. नोव्हेंबरमध्ये सुरुवातीला तीन-चार दिवस कोरडे वातावरण होते.

Onion Crop | Agrowon

रोपवाटिका हव्या तशा नाहीत

लागवडीसाठी पुरेसे रोप राहणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे लागवडीचे नियोजनही कोलमडणार आह. तसेच कांद्याची लागवड कमी होईल. रोपवाटिका हव्या तशा नसल्याने लागवड घटणार आहे.

Onion Crop | Agrowon

ढगाळ वातावरण

पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले. सध्याही निरभ्र, कोरडे वातावरण नाही. दुपारी उकाडा होतो. सध्या ढग दाटून येतात.

Onion Farming | Agrowon

बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव

कांदा रोपवाटिकांमध्ये बुरशीजन्य रोग पसरत असून, किडींचाही प्रादुर्भाव होत आहे. ही समस्या रोखण्यासाठी शेतकरी कीडनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत आहेत. यातच विषम वातावरणात रोपवाटिकांमध्ये नुकसान झाले आहे.

Onion Farming | Agrowon
Wheat Irrigation | Agrowon
आणखी पाहा...