Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan Distribution : बँकांनी कर्जपुरवठ्यासाठी गावांचे पालकत्व घ्यावे

Kharif Season 2025 : बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्टे पूर्ण करावे. शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. बँका आणि शेतकरी यांचा समन्वय असावा.

Team Agrowon

Solapur News : शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी पीककर्जाचा पुरवठा करुन शेतकऱ्यांना मदत करावी, त्यासाठी बँकांनी एक शाखा, एक गाव, या पद्धतीने पालकत्व घेऊन हे काम करावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

दक्षिण सोलापूर तालुका खरीप पीककर्ज वाटप आढावा बैठकीत आमदार देशमुख हे बोलत होते. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, दक्षिण सोलापूर दत्तात्रय मोरे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राम वारकडे, कृषी विभागाचे प्रतिनिधी व तालुक्यातील सर्व बँक शाखाधिकारी उपस्थितीत होते.

आमदार देशमुख म्हणाले, बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्टे पूर्ण करावे. शेतकऱ्यांची अडवणूक करू नका. बँका आणि शेतकरी यांचा समन्वय असावा. शेतकऱ्यांना गरज असेल, त्यावेळी तात्काळ मदत करा, शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, ही भूमिका घ्या. नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करा व त्यांना प्रोत्साहन द्या.

सर्व बँकानी शेतकरी मेळावे घेऊन जनजागृती करावी. बँकाच्या परिसरात ग्राहकांना सोईसुविधा द्या. शासनाच्या योजना आपल्या बँका मार्फत राबविल्या जातात. त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करा.

बँकांनी विकासाचा केंद्रबिंदू बनून काम करावे. एक गाव, एक बँक या पद्धतीने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. बचत गटांच्या महिलांना अर्थसाहाय्य करावे व त्यांना उद्योजक करावे. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेवर चा विश्वास वाढेल, असेही ते म्हणाले.

सप्टेंबरमध्ये पर्यटन सप्ताह

जिल्ह्यात पर्यटन सप्ताह साजरा करण्याचा मानस यावेळी आमदार देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच २७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात यानिमित्ताने विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT