Tembhu Irrigation Project Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Project : ‘टेंभू’ला रिक्त पदांचे ग्रहण

Tembhu Irrigation : टेंभू सिंचन प्रकल्पामुळे दुष्काळी टापूत माळरान फोडून शेती फुलविली. याच प्रकल्पात वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील ४१० पदे मंजूर आहेत. सध्या १२९ पदे कार्यरत असून, २८१ पदे रिक्त आहेत.

Abhijeet Dake

Sangli irrigation News : टेंभू सिंचन प्रकल्पामुळे दुष्काळी टापूत माळरान फोडून शेती फुलविली. याच प्रकल्पात वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील ४१० पदे मंजूर आहेत. सध्या १२९ पदे कार्यरत असून, २८१ पदे रिक्त आहेत.

प्रकल्पातील एका अधिकाऱ्यांकडे तीन ते चार विभागांची जबाबदारी आहे. परिणामी टेंभू प्रकल्पाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. रिक्त पदांची भरती नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

टेंभ प्रकल्प सुरू झाल्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाण्याची आस लागली. हळूहळू योजना पूर्ण होऊ लागली. तसे पाणी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातून कडेगाव, विटा, आटपाडी तालुक्यातून पुढे जाऊ लागले. शाश्‍वत पाण्याची सोय होऊ लागली.

टेंभू प्रकल्पात सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांचा समाविष्ट आहे. या तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यातील २१० गावांतील शेतीला पाणी पोहोचवले जाते. शेतकऱ्यांनी डोंगर फोडून डाळिंब बागा लावल्या. द्राक्ष लागवड वाढली, बागायती क्षेत्र वाढले. त्यामुळे या गावात आर्थिक सुबत्ता आली.

टेंभू प्रकल्पात वर्ग एक ते वर्ग चार या संवर्गातील ४१० पदे मंजूर आहेत. त्यापैकी २८१ पदे रिक्त आहेत. मुळात ही योजना मोठी असल्याने मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे.

आवर्तन सुरू करणे, पाणी पट्टी वसुली, देखभाल दुरुस्ती यासह अन्य कामे पाहिली जातात. त्यातच एका अधिकाऱ्यांकडे तीन ते चार विभागांचा अतिरिक्त कारभार दिला आहे. परंतु रिक्त पदे असल्याने अनेक कामांना खीळ बसली आहे. तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील सध्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनीही याकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.

टेंभू सिंचन प्रकल्पातील पदे

पद - मंजूर - कार्यरत- रिक्त

कार्यकारी अभियंता- १- १ - ०

उपविभागीय अभियंता - ९- ६ - ३

शाखा अभियंता - ४१ - १५- २६

वर्ग ३ - २७२ - ७९- १९३

वर्ग ४ - ८६ - २७ - ५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT