One Nation One Election Agrowon
ॲग्रो विशेष

One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’विधेयक लोकसभेत सादर

Parliament Session : संसदेत लोकसभेत मंगळवारी (ता. १७) ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’या विषयावर घटनेतील १२९ संशोधन विधेयक २०२४ लोकसभेत मांडले.

Team Agrowon

New Delhi News : संसदेत लोकसभेत मंगळवारी (ता. १७) ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’या विषयावर घटनेतील १२९ संशोधन विधेयक २०२४ लोकसभेत मांडले.

या विधेयकावर इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिनने मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने २६९ आणि विरोधात १९६ मते पडली. एकूण ३६९ सदस्यांनी मतदान केले.या प्रक्रियेवर विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला.

त्या वेळी गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे सांगितले. यावर लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले, की आम्ही आधीच सांगितले होते, की जर एखाद्या सदस्याला तसे वाटत असेल तर त्यांनी मतपत्रिकेद्वारे त्यांचे मत द्यावे. त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया सांगितली. ते म्हणाले, की तुम्ही जेव्हा मतदान करतात तेव्हा चुकून बटन दाबले गेले असेल तर मतपत्रिकेद्वारे तुम्ही ती चूक दुरुस्त करू शकतात. लोकसभेचे सेक्रेटरी जनरल तुमची पूर्ण व्यवस्था करतील. कारण अनेक खासदार नवीन आहेत. ते पहिल्यांदाच संसदेत आले आहेत.

लोकसभेची कारवाई स्थगित

मतपत्रिकेवर मतदान झाल्यानंतर प्रस्तावाच्या बाजूने २६९, तर विरोधात १९६ मते पडली. त्यानंतर कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर लोकसभेची कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT