Strawberry Planting Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Cultivation : पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवडीस एक महिना विलंब

Strawberry Farming Issue : सप्टेंबर महिन्यात होणारी स्ट्रॉबेरी लागवड आता ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्याने बाजारात स्ट्रॉबेरी एक महिना उशिरा म्हणजे डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे.

Team Agrowon

Satara News : महाबळेश्‍वर, जावळी तालुक्यांत स्ट्रॉबेरी लागवडीस अति पावसाचा फटका बसला आहे. सप्टेंबर महिन्यात होणारी स्ट्रॉबेरी लागवड आता ऑक्टोबर महिन्यात सुरू झाल्याने बाजारात स्ट्रॉबेरी एक महिना उशिरा म्हणजे डिसेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहे. लागवडीच्या काळात जोरदार पाऊस झाल्याने रोपाच्या नर्सरीचेही मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात अतिपावसामुळे खरिपातील सोयाबीन, भुईमूग, घेवडा पिकांच्या नुकसानीबरोबर स्ट्रॉबेरी पिकाचे नुकसान सुरू झाले आहे. महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्यात लागवड सुरू होते. यामुळे दिवाळीच्या हंगामात ग्राहकांना स्ट्रॉबेरी उपलब्ध होत असते. या वेळी मात्र सप्टेंबर महिन्यात महाबळेश्‍वर, जावळी, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्यांत बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला आहे.

याचा परिणाम स्ट्रॉबेरी रोपे व लागवडीवर झाला आहे. अतिपावसामुळे नर्सरीतील नभिला, विंटर डाउन या लवकर लागवड केल्या जाणाऱ्या जातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सततच्या पावसामुळे शेतजमीनही तयार करता आली नाही. यामुळे सप्टेंबर महिन्यात अगदी किरकोळ क्षेत्रावर लागवड झाली आहे. या पावसामुळे सुमारे एक महिना स्ट्रॉबेरीची लागवड लांबली असल्याने यंदा दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध होणार नाही.

सध्या पावसाची उघडीप मिळताच लागवडीचे काम सुरू होणार आहे. विनाअडथळा लागवडीची कामे व्यवस्थित पार पडल्यास किमान डिसेंबर महिन्यात तसेच नाताळ व नववर्षात स्वागत स्ट्रॉबेरीचा आस्वाद ग्राहकांना मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची आशा आहे. मात्र आता परतीचा पाऊस झाल्यास सुरू झालेली लागवड पुन्हा ठप्प होणार आहे. या लागवडीस पावसाने अडचण झाल्यास मोठे नुकसान होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस स्ट्रॉबेरीचे अंतिम क्षेत्र समजणार आहे. जिल्ह्यात या वर्षी विविध देशांतून १६ लाख मदरप्लॉट (मातृवृक्ष) आयात करण्यात आली आहेत. या मदरप्लॉटपासून मोठ्या प्रमाणात रोपे तयार झाली आहेत. उत्तर भारतातून रोपे नेली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी रोपे विक्रीसाठी तयार केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात रोपे उपलब्ध आहेत. मात्र या हंगामात रोपाची मागणी कमी असल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

महाबळेश्‍वर तालुक्यात ३००० एकरांवर लागवड

महाबळेश्‍वरसह जावली, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्यात सरासरी चार हजार एकर स्ट्रॉबेरी लागवड होते. यामध्ये सर्वाधिक महाबळेश्‍वर तालुक्यात २८०० ते ३००० एकर लागवडीचे क्षेत्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT