Kisan Rail Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Transport : शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला एक कोटीचा महसूल

Kisan Rain : शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल परराज्यात जाण्यासाठी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा देवळाली ते दानापूर ही शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सुरू केली आहे.

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल परराज्यात जाण्यासाठी मध्य रेल्वेने पुन्हा एकदा देवळाली ते दानापूर ही शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सुरू केली आहे. आतापर्यंत दिल्ली, चेन्नई व गुवाहाटी येथे ८,०१७ टन कांदा पुरवठा झाला आहे. शेतीमाल वाहतुकीतून पहिल्या तीन आठवड्यांत रेल्वेला एक कोटी महसूल मिळाला आहे.

शेतकऱ्यांना कांद्यासारखा नाशवंत माल थेट रेल्वेने पाठविण्याची सुविधा देण्यासाठी भुसावळ विभागाने या रेल्वेत १० बोगी शेतीमालासाठी (प्रत्येकी २३ टन) आणि १० सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. ही किसान समृद्धी एक्स्प्रेस १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, दर शनिवारी धावते.

जबलपूर, सतना, प्रयागराज, आरा, बक्सर आणि दानापूर या शहरांत जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल वेळेवर पोहोचविण्यासाठी मोठी सोय झाली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

जिल्ह्यातून डाळिंब, सीताफळ, द्राक्षे, कांदा, संत्री, लिंबू आदी परराज्यात जात आहे. त्यातून सुमारे १० लाख रुपयांचा महसूल रेल्वेला मिळत आहे. ही शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे ३० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. देशातील सर्वांत लहान शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल देशाच्या दूर टोकाला पाठविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

देशभरातील कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे, लासलगाव स्थानकावरून दिल्लीतील किशनगंज, चेन्नईमधील कोरुक्कुपेठ आणि गुवाहाटीजवळील चांगसारी येथील प्रमुख ग्राहक केंद्रांमध्ये कांदा पाठविण्यास सुरुवात केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील फेडरेशन, नाफेड आणि एनसीसीएफ यांच्याशी समन्वय साधत शहरी केंद्रांपर्यंत जलद आणि मोठ्या प्रमाणात वितरण करून किमतीवर प्रभावीपणे बाजारभावावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न यामुळे शक्य झाला आहे. या उपक्रमामुळे सरकारच्या किमती नियंत्रणाच्या प्रयत्नांना केवळ पाठिंबाच मिळाला नाही तर भुसावळ विभागासाठी मालवाहतूक महसूलही मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement Date Extension : कापूस खरेदीला १५ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी सीसीआयचा महत्वाचा निर्णय

Sugarcane FRP: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ४,६०१ कोटी एफआरपी थकीत, ४५ कारखाने रडारवर

Raisin Export: बेदाणा निर्यात ८१ टक्क्यांनी घटली, द्राक्ष उत्पादक संकटात; सरकारची कबुली

Bageshwari Lake: बागेश्वरी तलाव परिसर पर्यटनाचे नवे केंद्र

Maize Procurement: मक्याचे दर घसरले; २५ हजार क्विंटल खरेदीवर ब्रेक

SCROLL FOR NEXT