Urea Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Shortage : दीड लाख टन युरिया संरक्षित

Urea Fertilizer Stock : राज्यामध्ये खरीप कालावधीत युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीने दीड लाख टन युरिया व आणि २५ लाख टन डीएपीचा संरक्षित साठा करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज्यामध्ये खरीप कालावधीत युरिया व डीएपी खतांचा तुटवडा भासू नये या दृष्टीने दीड लाख टन युरिया व आणि २५ लाख टन डीएपीचा संरक्षित साठा करण्यात येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली खत साठा संरक्षित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडलेल्या बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे अरुण दलाल, महाराष्ट्र कृषी व उद्योग विकास महामंडळचे महेंद्र बोरसे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

२०२४ च्या खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान गृहीत धरल्यास रासायनिक खतांच्या मागणीत वाढ होऊ शकते. तसेच रासायनिक खते पुरवठा होण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावरून अडचणी निर्माण होऊ शकतात असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हंगामात पेरणी आणि उभ्या पिकांना नत्रयुक्त खताचा दुसरा हप्ता देण्यासाठी युरिया खताची आणि पेरणीच्या वेळी डीएपी खताची शेतकऱ्यांकडून एकाच वेळी मागणी होत असते.

अशा वेळी रेल्वे वाहतूक आणि अन्य कारणांमुळे अडथळा आल्याने शेतकऱ्यांना वेळेवर खत पुरवठा होत नाही. यासाठी खताचा साठा संरक्षित करणे गरजेचे असते. यंदा आगामी खरीप हंगामासाठी दीड लाख टन युरिया आणि २५ लाख टन डीएपी खताचा साठा संरक्षित करण्यास मान्यता दिली आहे.

संरक्षित साठा करण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या संस्थांनी आवश्यक ती कार्यवाही करावी अशाही सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

खरीप हंगामातील जून व जुलै महिन्यामध्ये युरिया व डीएपी खतांची आवक मागणीपेक्षा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य तुटवडा भासू नये म्हणून संरक्षित साठा करावा. राज्यामध्ये करण्यासाठी नोडल एजन्सींना खत साठवणूक, वाहतूक विमा खताची चढाई उतराई, जीएसटी सेवा शुल्क इत्यादी आनुषंगिक खर्चासाठी निधीची तरतूद करण्यात येईल.
धनंजय मुंडे, कृषिमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT