Okra Vegetable Agrowon
ॲग्रो विशेष

Okra Crop : जळगावात भेंडी पिकाचे क्षेत्र घटले

Okra Production : जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील भेंडीचे आगार अशी ओळख असलेल्या एरंडोल, धरणगाव भागांत भेंडीचे क्षेत्र कमी झाले आहे. उष्णतेमुळे अनेकांनी लागवड टाळली आहे. एरंडोलमधील खर्ची, खेडी, कढोली, धारागीर, एरंडोल, कासोदा, जवखेडा, उत्राण, तळई आदी भागांत भेंडी पीक असते.

तसेच धरणगावमधील पथराड, चोरगाव, चांदसर, दोनगाव, पाळधी, रेल, लाडली, भोकणी, फुलपाट, आव्हाणी व इतर भागांत भेंडी पीक बारमाही घेतले जाते. पावसाळ्यातही या भागात भेंडी असते. तसेच अनेक जण मार्चमध्ये लागवड करतात. परंतु मार्च व एप्रिलमधील लागवड घटली आहे. भेंडीची लागवड कमी झाली आहे.

ज्या भागात लागवड झाली आहे, त्यातून पुढील महिन्यात किंवा ३० ते २३ दिवसांनंतर भेंडीची काढणी सुरू होईल. यामुळे सध्या भेंडीची बाजारातील आवक कमी झाली आहे. या भागातील ज्या शेतकऱ्यांची भेंडी काढणीवर आहे, त्यांना थेट जागेवर किंवा शिवार खरेदीत २० ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे.

कमी दर्जाच्या किंवा दुय्यम दर्जाच्या भेंडीसही २० रुपये प्रतिकिलोचा दर आहे. या गावांत एरंडोल, धरणगाव भागातील मोठे खरेदीदार, एजंट भेंडीची खरेदी करीत आहेत. या भेंडीची पाठवणूक मुंबई, ठाणे, मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील सुरत, बडोदा येथे केली जात आहे. यामुळे स्थानिक बाजारात भेंडीची आवक कमी आहे. जळगाव इतर शहरांमधील आठवडी व इतर बाजारांत विक्रेते भेंडीची ५० ते ६० रुपये प्रतिकिलो या दरात विक्री करीत आहेत.

जळगाव येथील भाजीपाल्याचा बाजार प्रसिद्ध आहे. या बाजारात औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोडसह धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल आदी भागातूनही भाजीपाल्याची आवक होते. परंतु सध्या भेंडीची आवक निम्म्यावर किंवा त्यापेक्षा कमी आहे. डिसेंबरमध्ये भेंडीची जळगावच्या बाजारात प्रतिदिन सरासरी १७ क्विंटल आवक झाली होती.

या महिन्यात मागील आठ दिवसांत ही आवक प्रतिदिन सरासरी ८ क्विंटल एवढीच आहे. यात बुधवारी, गुरुवारीही आवक यापेक्षा कमी राहिल्याची नोंद झाली आहे. भेंडीला ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये बाजारात प्रतिकिलो १५ ते २० रुपये दर शेतकऱ्यांना मिळाला होता. उन्हाळ्यात दर १५ रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत मिळाले. मार्चमध्ये अनेक शेतकऱ्यांनी भेंडीचे क्षेत्र रिकामे केले पण पुन्हा भेंडी लागवड केली नाही. यामुळे हे क्षेत्र घटले आहे. पुढे जुलैत किंवा या महिन्याच्या मध्यात लागवड सुरू होईल, असे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT