Pomegranate Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Crop Disease: डाळिंबावर तेलकट डाग, कुजवा रोगाचा प्रादुर्भाव

Pomegranate Farmer Issue: डाळिंब पिकावर सध्या नैसर्गिक संकटाचे सावट गडद झाले आहे. तेलकट डाग आणि कुजवा रोगाचा प्रादुर्भाव, अनियमित हवामान व वाढलेला खर्च यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: बदलत्या वातावरणाचा फटका डाळिंब पिकालाही बसला आहे. यामुळे डाळिंबावर तेलकट डाग आणि कुजवा रोगाचा १० टक्के प्रादुर्भाव झाला आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करू लागला आहे. मात्र वातावरणातील बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यास अडथळे येवू लागले आहेत. त्यामुळे खर्चही वाढला असल्याने डाळिंब नैसर्गिक संकटाच्या कचाट्यात सापडला आहे.

राज्यात आंबिया बहर ३० ते ३५ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी धरला आहे. त्यापैकी ५० टक्के बागांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यातूनही काही शेतकऱ्यांनी बागा साधल्या. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

सद्यःस्थितीला डाळिंब १५० ते २०० ग्रॅमहून अधिक वजनाचे आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे अगोदरच पीक संकटात सापडले असतानाच अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. कधी कडक उन्ह, कधी ढगाळ वातावरण, हवामानातील बदल या साऱ्याचा परिणाम पुन्हा डाळिंबावर होऊ लागला आहे. यामुळे तेलकट डाग आणि कुजवा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरात जवळपास १० टक्के या दोन्ही रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे डाळिंब संघाने सांगितले आहे.

सध्या तेलकट आणि कुजवा रोगाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी फवारणीचे नियोजन केले आहे. परंतु वातावरण असेच राहिल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढेल अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. परिणामी, एकरी १० ते १५ टक्के खर्च वाढला आहे. एकंदर नैसर्गिक संकटामुळे उत्पादनात २० टक्के घट होईल, असा प्राथमिक अंदाज डाळिंब संघाने व्यक्त केला आहे.

मृग बहरही धोक्यात

राज्यात सर्वसाधारणपणे ५० हजार हेक्टरवर मृग बहर धरला जातो. यंदा अंदाजे १५ टक्के क्षेत्रावर आगाप मृग बहर धरला आहे. बहुतांश भागातील डाळिंबाच्या बागा कळी अवस्थेत तर काही बागा फुलोरावस्थेत आल्या आहेत. परंतु बदलत्या वातावरणाचा फटका मृग बहरातील डाळिंबालाही बसला आहे. त्यामुळे मृग बहर देखील काही अंशी धोक्यात आला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

पावसामुळे डाळिंबाचे नुकसान झाले. त्यात आता बदलत्या वातावरणामुळे अजून नुकसान वाढेल. निसर्गाच्या संकटात डाळिंब पीक अडकू लागले असल्याने अडचणीत वाढल्या आहेत.
प्रभाकर चांदणे, अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT