Ethanol  Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Supply : तेल कंपन्यांना नोव्हेंबरमध्ये अल्प इथेनॉल पुरवठा

November Ethanol Shortage : देशातील महत्त्वाच्या राज्यांतील साखर हंगामास झालेला उशीर व इतर अन्नधान्याच्याही पुरेशा उपलब्धतेअभावी नोव्हेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीला अडथळे आले.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशातील महत्त्वाच्या राज्यांतील साखर हंगामास झालेला उशीर व इतर अन्नधान्याच्याही पुरेशा उपलब्धतेअभावी नोव्हेंबरमध्ये इथेनॉल निर्मितीला अडथळे आले. याचा विपरीत परिणाम तेल कंपन्यांच्या इथेनॉल पुरवठ्यालाही झाला आहे. इथेनॉल प्रकल्‍पांकडून तेल कंपन्यांना अपेक्षेपेक्षा कमी इथेनॉल पुरवठा होत आहे.

गेल्या वर्षी मक्यासारख्या महत्त्वाच्या धान्याचेही उत्पादन कमी झाल्याने मक्यापासून इथेनॉल निर्मितीही घटली आहे. गेल्या इथेनॉल वर्षात ९७० कोटी लिटर इथेनॉलची मागणी होती. त्‍यापैकी तेल कंपन्यांना ८३७ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला.

पुढील वर्षासाठी (२०२४-२५) ९१६ कोटी लिटर इथेनॉलची मागणी कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांनी नोंदविली आहे. कंपन्यांनी इथेनॉल उत्पादकांना केलेल्या मागणीत मक्याचा सर्वाधिक वाटा ५१.५२ टक्के (सुमारे ४३१.१ कोटी लिटर), त्यानंतर उसाचा रस २२.५६ टक्के (सुमारे १८८.७ कोटी लिटर), बी हेवी मोलॅसिस १३.६१ टक्के (११३.९ कोटी लिटर), खराब झालेले अन्नधान्य आहे. ११.२२ टक्के (९३.८ कोटी लिटर), आणि सी हेवी मोलॅसिस १.०९ टक्का (९.१५ कोटी लिटर) इतका आहे. याचाच अर्थ मक्यापासून बनविलेल्‍या इथेनॉलला अधिक मागणी आहे.

यंदा मक्याचे उत्पादन २४५ लाख टन होण्याची शक्‍यता आहे. गेल्‍या वर्षी ते २२२ लाख टन होते. केंद्राने गेल्‍या खरीप हंगामात अनेक ठिकाणी मक्याची लागवड वाढविण्यासाठी अनेक कार्यक्रम घेतले होते. यामुळे मक्याच्या लागवडीतही वाढ झाली. यामुळे यंदा गेल्या वर्षीपेक्षा जादा उत्पादन होईल अशी शक्यता केंद्र सरकारची आहे. यंदा बाजारात अजूनही हव्या त्या प्रमाणामध्ये नवा मका आलेला नाही. यामुळे अनेक प्रकल्प शिल्लक मक्यावरच इथेनॉल निर्मिती करत आहेत.

ग्रेन इथेनॉल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (गेमा) दिलेल्या माहितीनुसार, सध्या केवळ उत्तर प्रदेशातील साखर हंगाम वेगात सुरू आहे. महाराष्ट्र व कर्नाटकाचा हंगाम सुरू होऊन केवळ आठवड्याचा कालावधी झाला आहे. ही राज्ये ऊस उत्पादनात आघाडीवर मानली जातात. पण निवडणुकीमुळे विशेष करून महाराष्ट्रात हंगाम उशिरा सुरू झाला.

यामुळे गाळपाची गती कमी आहे. कर्नाटकातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, सिक्कीम, बिहार आणि मध्य प्रदेश ही राज्ये इथेनॉल उत्पादनासाठी अग्रेसर आहेत. पण नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम सुरू नसल्याने याचा विपरीत परिणाम इथेनॉल निर्मितीवरही झाला.

डिसेंबरमध्ये इथेनॉल निर्मिती वाढण्याची शक्यता

डिसेंबरमध्ये नोव्हेंबरच्या तुलनेत इथेनॉल निर्मितीचा वेग वाढेल असा अंदाज आहे. केंद्राने या महिन्यात इथेनॉल दरवाढीचा निर्णय घेतल्यास उत्पादन अधिक उत्साहाने होईल. इथेनॉल प्रकल्प निर्मिती वाढवतील. याचा परिणाम इथेनॉलचे उत्पादन वाढण्यावरही होईल अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT