Mosambi Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Mosambi Management : मोसंबीसाठी अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे

Mosambi Orchard : शेतकऱ्यांनी मोसंबी बागेचे योग्य नियोजन केल्यास निश्चितच चांगले उत्पन्न मिळविणे शक्य आहे.

Team Agrowon

Jalana News : शेतकऱ्यांनी मोसंबी बागेचे योग्य नियोजन केल्यास निश्चितच चांगले उत्पन्न मिळविणे शक्य आहे. यासाठी काटेकोरपणे पीक व्यवस्थापनावर भर द्यावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता आणि धाराशिव येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांनी दिला.

ॲग्रोवन आणि सन अँड ओशन ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भांबेरी येथे ‘कमी पाण्यात मोसंबी पीक व्यवस्थापन’ या विषयावर रविवारी (ता. 22) ॲग्रोवन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, की लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करणे गरजेचे आहे.

मुक्त चुन्याचे प्रमाण १० टक्यांपेक्षा जास्त असल्यास मोसंबी लावू नये. दक्षिण उत्तर लागवड करणे फायद्याचे ठरते. पहिली तीन ते चार वर्षानंतर आंतर पीक घ्यावे. कापूस,उसासारखे पीक मोसंबीत घेऊ नये. शेणखत, हिरवळीचे खत यांचा वापर करावा. खोडाला बोर्डोपेस्ट लावावी. वाळलेल्या फांद्या काढून टाकाव्या. दर्जेदार उत्पादनासाठी अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.

यावेळी कातपुरचे विकास मोरे, अंतरवाली सराटी येथील रामप्रसाद तारक यांनी मोसंबी पिकाबाबत आपले अनुभव सांगितले. सन अॅड ओशन कंपनीचे संचालक सुरज धुरगुडे यांनी कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲग्रोवनचे साहाय्यक वितरण व्यवस्थापक अजित वाणी यांनी तर सूत्रसंचालन वितरण प्रतिनिधी चेतन सोनवणे यांनी केले. आभार सन अँड ओशन कंपनीचे विक्री व्यवस्थापक अजीज शेख यांनी मानले.

यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब कणके पाटील, आर. एम. सुशे, समर्थ बँकेचे अध्यक्ष संजय कणके, शरद साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक नामदेव बावडेकर, अण्णासाहेब कणके, कृषी सहाय्यक योगेश पाटील, गजानन कणके, दादासाहेब कणके आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT