Bullock Cart Race Agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart Race : आता गावागावांत रंगणार बैलगाडा शर्यतीची चुरस

Bullock Cart Race Update : प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना बैलगाडा स्‍पर्धांच्या परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Team Agrowon

Mumbai News : बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्याचे अधिकार सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ही परवानगी सात दिवसांत देणे बंधनकारक असल्याने आयोजकांना कागदपत्रे सादर करण्यास व परवानगी मिळवण्यासाठी विलंब व्हायचा. परवानगीचे काम सुलभ व नियमांचे पालन करून व्हावे, याकरिता आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना बैलगाडा स्‍पर्धांच्या परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त यांच्याकडील परिपत्रकान्वये राज्यातील बैलगाडा शर्यती आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना (SOP) निर्गमित करण्यात आली आहे. यामधील नियम व अटी-शर्थीचे काटेकोरपणे पालन करून राज्यात बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली जात आहे.

महाराष्ट्रातील संस्कृती व परंपरेनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव अशा प्रसंगी रायगड जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींना परवानगीसाठी मोठया प्रमाणावर अर्ज येतात. अर्ज प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांत शर्यतीसाठी परवानगी दिली जाते, परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्जदारास आवश्यक त्या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव विहित मुदतीत सादर करणे,

कागदपत्रांची/त्रुटींची पूर्तता करणे तसेच संबंधित विभागांचे अहवाल/अभिप्राय प्राप्त होणे यासाठी बराच अवधी लागतो. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार बैलगाडा शर्यतीस परवानगी देण्याचे सर्व अधिकार जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

आयोजकांना दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तसेच पशुसंवर्धन विभागाकडून अधिसूचनांमध्ये नमूद केलेल्या नियमानुसार ही परवानगी दिली जाणार आहे. स्थानिक पातळीवर परवानगी मिळणार असल्याने आयोजकांनाही दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertiliser Subsidy : देशात मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यासाठी २६ टक्के अधिकचा खतसाठा; केंद्र सरकारचा लोकसभेत दावा

LPG Gas Price: एलपीजी दरवाढ तत्काळ रद्द करा

Food Preservation Technology: अन्नपदार्थ साठवण कालावधी वाढविण्याचे तंत्रज्ञान

Shettale Yojana: शेततळे अनुदान, १७ हजार अर्ज रद्द, कारण काय?

Ammonium Sulphate Fertilizer: अमोनिअम सल्फेटचा फायदेशीर वापर

SCROLL FOR NEXT