Orange Farmer  Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Producer : संत्रा बागायतदारांसाठी ‘सीसीआरआय’ची उपयोगिता शून्य

CCRI : संत्रा उत्पादकांच्या उत्कर्षात गेल्या काही वर्षात त्यांचे काहीच योगदान नाही. परिणामी या संस्थेच्या कामकाजाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांनी केली आहे.

Team Agrowon

Amravati News : केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था (सीसीआरआय) संशोधनात्मक पातळीवर कुचकामी ठरली आहे. संत्रा उत्पादकांच्या उत्कर्षात गेल्या काही वर्षात त्यांचे काहीच योगदान नाही.

परिणामी या संस्थेच्या कामकाजाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील संत्रा बागायतदारांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे.

संत्रा बागायतदारांच्या निवेदनानुसार, देशात लिंबूवर्गीय पिकात संशोधनाला चालना मिळावी या उद्देशाने सुमारे ४० वर्षांपूर्वी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रातील संत्रा बागायतदारांना याचा फायदा व्हावा याकरिता संस्थेचे मुख्यालय ऑरेंज सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपुरात देण्यात आले. महाराष्ट्रातील दीड लाख हेक्‍टरवरील संत्रा बागायतदारांचे हित याद्वारे साधले जाईल अशी अपेक्षा होती.

परंतु गेल्या ४० वर्षांत वाण, तंत्रज्ञान देण्यात संस्था कुचकामी ठरली. परिणामी संत्रा बागायतदारांच्या दृष्टीने सीसीआरआयची उपयोगिता शून्य ठरली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत संत्रापट्ट्यात फळगळतीच्या समस्येने डोके वर काढले आहे. या समस्येचे निदान शोधण्यातही संस्था अपयशी ठरली.

कृषी विभागाकडून सातत्याने संस्थेशी पत्रव्यवहार करून या समस्येबाबत मार्गदर्शनाची मागणी केली जाते. सीसीआरआयच्या तज्ज्ञ पथकाने पाहणी करून मार्गदर्शन करावे, असेही सांगितले जाते. परंतु सीसीआरआयच्या मुजोर प्रशासनाकडून कृषी विभागाला देखील दाद दिली जात नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा प्रतिसाद कसा असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. नरेंद्र शिंगणे, प्रदीप रावसाहेब बंड, राहुल उभाड, संतोष काळे, संदीप घुलक्षे, मामासाहेब निर्मठ, प्रदीप येवले, गोपाल बकाले, लता वैद्य, अरविंद सुरने, गोपाल धुर्वे यांचा निवेदनकर्त्यांमध्ये समावेश होता.

केंद्र सरकारने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ‘सीसीआरआय’ची स्थापना केली. परंतु लिंबूवर्गीय पीकधारकांसाठी या संस्थेची शून्य उपयोगिता आहे. त्यामुळे संस्थेच्या कामकाजाचे ऑडिट करून प्रसंगी ही निरुपयोगी संस्था बंद करावी, अशी आमची मागणी आहे.
- प्रदीप बंड, संत्रा बागायतदार, जसापूर, चांदूरबाजार, अमरावती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT