Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Seed : ‘महाबीज’कडून २२ किलोच्या पॅकिंगमध्ये सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा

Kharif Season : सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाने केल्यास प्रतिएकरी २२ किलो बियाणे पुरेसे असते.

Team Agrowon

Hingoli News : सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञानाने केल्यास प्रतिएकरी २२ किलो बियाणे पुरेसे असते. या उद्देशाने महाबीजकडून सोयाबीन बियाण्याची प्रती बॅग २२ किलो वजनामध्ये पॅकिंगच करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानावरील सोयाबीनचे प्रमाणित बियाणे वाटपामध्ये कोणताही घोटाळा नसल्याचा खुलासा महाबीज व कृषी विभागाकडून करण्यात आला आहे.

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीतधान्य अंतर्गत हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये सोयाबीन पिकाचे समूह निवडण्यात आलेले आहेत. त्यासाठी पाच वर्षाच्या आतील सोयाबीनच्या वाणांचे बियाणे १०० टक्के अनुदानावर कमीत-कमी ०.२० हेक्टर ते १ हेक्टर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे वाटपाचा कार्यक्रम चालू आहे.

त्यासाठी नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ७५ किलो बियाणे मंजूर असल्याच्या सूचना कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त आहेत. त्यासाठी महाबीजकडून प्रतिबॅग २२ किलो पॅकींग असलेले बियाणे देण्यात येत आहे. सोयाबीनची पेरणी बीबीएफ टोकन तंत्रज्ञानाद्वारे केल्यास उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

त्यासाठी प्रती एकरी २२ किलो बियाणे पुरेसे असते. या उद्देशाने महाबीजकडून २२ किलो प्रती बॅग बियाणे पॅकिंग करण्यात आली आहे. तथापि, लाभार्थ्यांना ७५ किलो बियाणे मंजूर झाले असल्यास २२ किलो पॅकींगमध्ये ७५ किलो बियाणे देणे शक्य होत नाही. प्रमाणित बियाणे असल्याने ते बॅग फोडून देता येत नाही.

म्हणून २२ किलोच्या तीन बॅग म्हणजे ६६ किलो बियाणे देण्याचे निश्चित करण्यात आले. शेतकऱ्यांना ७५ किलो बियाणे पाहिजे असल्यास त्यांनी ८८ किलो बियाणे घेऊन ७५ किलो बियाणे अनुदानित व उर्वरित १३ किलो बियाणे विना अनुदानित स्वखर्चाने घ्यावे लागेल.

संबंधित प्रमाणित बियाणे वाटपामध्ये महाबीजकडून आणि कृषी विभागाकडून कोणताही घोटाळा नसून सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.बियाणे खरेदी करावे. शासकीय अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT