Cotton Seed Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Seed : तेलंगणातील चोरबिटी बियाणं नको रं बाबा...!

Bogus Cotton Seed : गेल्या काही वर्षांपासून पूर्व विदर्भात कापसाचा पेरा वाढला आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कापसाला प्रध्यान्य देऊ लागले आहेत.

संदीप रायपूरे 

Chandrapur News : गेल्या काही वर्षांपासून पूर्व विदर्भात कापसाचा पेरा वाढला आहे. नगदी पीक म्हणून शेतकरी कापसाला प्रध्यान्य देऊ लागले आहेत. फवारणीचा त्रास वाचतो, अशी भावना असल्याने अनेक शेतकरी चोरबिटी बियाणांचा वापर करतात. मात्र या बियांणाचा वापर शेतीसाठी नुकसानदायक असल्याचे वारंवार समोर येत आहे.

यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून तेलंगण सीमेलगत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील शेतकरी चोरबिटी ‘नको रं बाबा’ चा नारा देऊ लागले आहेत. असे असले तरी चोरबिटी बियाणांच्या तस्करांचे मोठे जाळे पूर्णवेळ कामात लागले आहेत.

पूर्व विदर्भ हा धानपिकाकरिता प्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी धानासोबत नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पिकाला प्राधान्य देत होते. पण सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने आता सोयाबीनची जागा कापूस पिकाने घेतली आहे.

आता धानानंतर कापूस हे प्रमुख पीक आहे. चंद्रपूर गडचिरोलीला लागून तेलंगण राज्याची सीमा आहे. याच राज्यातून चोरबीटी बियाणे तस्करीचे मोठे साम्राज्य निर्माण करण्यात आले होते. तसेच तस्करांचे मोठे जाळे पूर्णवेळ कामास लागले आहेत.

कापूस पीक घेताना चोरबिटी बियाणांचा वापर केल्यास कचऱ्याची समस्या दूर होणार यामुळे अनेकांनी याच बियाणांना पसंती दिली होती. पण आता वारंवार या चोरबीटी बियाणांचा वापर होत असल्याने शेतजमीन नाशवंत होण्याच्या मार्गावर आहे. सोबतच उत्पादनक्षमतेत कमालीची घट आली आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ही बियाणे नाकारण्याकडे कल वाढतो आहे.

कृषी विभागाची जागृती

तेलंगणला लागून चंद्रपुरातील गोंडपिपरी तालुका आहे. हाच मार्ग चोरबिटी तस्करीचा हब झाला होता. गोंडपिंपरीचे युवा तालुका कृषी अधिकारी सचिन पानसरे यांनी पदभार हाती घेताच हा मुद्दा हेरला.

अन् मग त्यांनी कारवाईचा सपाटा सुरू केला. कारवाईसोबतच त्यांनी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले. कार्यशाळेचेही आयोजन केले. आपल्या कर्मचाऱ्यांनाही सतर्कतेचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या उपक्रमशील प्रयोगाचाही बराच परिणाम आता दिसू लागला आहे. त्यामुळेच शेतकरी म्हणत आहेत, ‘तेलंगणची चोरबीटी बियाणे नको रे बाबा.’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT