Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Scheme : सुधारित पीकविमा योजनेसाठी अर्जाची ३१ जुलैपर्यंत संधी

Kharif Season 2025 : मागील दोन वर्षांपासून एक रुपयात सुरू असणारी पीकविमा योजना बंद करून सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना यावर्षीच्या खरीप हंगामापासून लागू करण्यात आलेली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : मागील दोन वर्षांपासून एक रुपयात सुरू असणारी पीकविमा योजना बंद करून सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना यावर्षीच्या खरीप हंगामापासून लागू करण्यात आलेली आहे. सुधारित पीकविमा योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासनाने जारी केल्या आहेत. या योजनेत फार्मर आयडी व ई-पीक पाहणी अनिवार्य असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत ३१ जुलैअखेर सहभाग नोंदवावा.

अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी कार्यालयास संपर्क करावा, असे आवाहन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. ही योजना अधिसूचित मंडळात अधिसूचित पिकांसाठी लागू आहे. शिवाय कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अथवा भाडेपट्ट्याने जमिनी घेणारे शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र आहेत.

यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार संकेततस्थळावर अपलोड करावा लागणार आहे. ही योजना सर्व खातेदारांना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांना २ टक्के खरीप हंगामासाठी, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तर दोन्ही हंगामांतील नगदी पिकासाठी ५ टक्के भरावा लागेल.

७० टक्क्यांपर्यंत पिकांचा जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. यावर्षी सातारा, सांगली व कोल्हापूर या ३ जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची निवड शासनाने केली आहे. शिवाय २०२५-२६ या वर्षाकरिता ८०:११० कप ॲण्ड कॅप मॉडेल नुसार राबविण्यात येईल.

या योजनेमध्ये खरीप हंगामात तृणधान्य व कडधान्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर व मका तर गळीत धान्यात भुईमूग, तीळ व सोयाबीन तसेच नगदी पिकांमध्ये कापूस व कांदा, रब्बी हंगामात गहू (बागायत) रब्बी ज्वारी (बागायत व जिरायती) हरभरा व उन्हाळी भात, गळीत धान्यामध्ये उन्हाळी भुईमूग व नगदी पिकांमध्ये रब्बी कांदा या पिकांसाठी योजनेत सहभाग घेता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT