Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : टॅगिंग नसल्यास दूध अनुदान नाही

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंटांकडून दूध गोळा करणाऱ्या काही डेअरी प्रकल्पांना टॅगिंग प्रणाली अडचणीची वाटते आहे. त्यामुळे थेट दूध अनुदान योजनेला आतून विरोध करण्याचा उद्योग काही प्रकल्पांनी चालू केला आहे. परंतु टॅगिंगशिवाय अनुदान मिळणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दुग्ध व्यवसाय विकास खात्याने दिला आहे.

दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे अलीकडेच राज्यातील दुग्ध प्रकल्पांची बैठक घेतली. सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान केवळ ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीपुरते मिळणार आहे. त्यासाठी नियमावलींचे काटेकोर पालन करण्याचा आग्रह बैठकीत धरण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की थातूरमातूर माहितीच्या आधारे अनुदान वाटप होणार नाही. दुधाळ गायीचे टॅगिंग केलेले नसल्यास अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका शासनाने घेतली आहे. दुधाळ गायीचा टॅगिंग क्रमांक, पशुपालक शेतकऱ्याचा आधार क्रमांक व बॅंक खाते क्रमांक एकमेकांशी संलग्न करण्याचा निर्णय अनुदानवाटपासाठी घेण्यात आला आहे.

नेमकी हीच बाब काही खासगी प्रकल्पांना अडचणीची ठरते आहे. शेतकऱ्यांकडून दुधाच्या खरेदी करता दूध संकलनासाठी २ ते ३ एजंटांची साखळी वापरणारे खासगी प्रकल्प या योजनेसाठी शेतकऱ्यांची माहिती देण्यात असमर्थ ठरणार आहेत.

आधी पुरावा आणि नंतर अनुदान

शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी शासकीय यंत्रणेने आयसीआयसीआय बॅंकेच्या मदतीने एक उपयोजन (अॅप्लिकेशन) विकसित केले आहे. या उपयोजनावर संकलित होणारी माहिती अनुदान वितरणासाठी वापरली जाणार आहे.

प्रतिलिटर २७ रुपये दर अदा केल्याचा पुरावा दिला असेल तरच पाच रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी एजंटांकडून दूध खरेदी करणाऱ्या काही डेअरीचालकांची घाबरगुंडी उडाली आहे. परिणामी, ही योजना शेतकऱ्यांना समजावून सांगणेही नको व त्यांची माहिती राज्य शासनाला पाठवणेदेखील नको, अशी मधली भूमिका या डेअरीचालकांनी घेतली आहे.

टॅगिंगची योजना अतिशय उपयुक्त आहे. माझ्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात टॅगिंग ८० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम आठवडाभरात होईल.
- प्रकाश कुतवळ, संचालक, कुतवळ ऊर्जा फूड्‌स
शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्यासाठी टॅगिंगसाठी सहकारी संघांकडून प्रबोधन केले जात आहे. किचकट नियमांमुळे अडचणी येत असल्या तरी शेतकरी हितासाठी सहकारी व खासगी संघ नियोजन करीत आहेत.
- गोपाळराव म्हस्के, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT