Wheat Production Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Production: उष्णतेच्या लाटांचा गहू उत्पादनावर परिणाम नाही; केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा

Heatwave Impact : मेच्या दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे गहू काढणीनं वेग घेतला आहे. पीकही परिपक्व झालं आहे. त्यामुळे उत्पादनाच्या अंदाजावर परिणाम होण्याची चिन्हं नाहीत, असं कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे.

Dhananjay Sanap

Shivraj Singh Chouhan : देशातील गहू उत्पादनावर हवामानाचा परिणाम होणार नसून गहू उत्पादन ११५.३ दशलक्ष राहील, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. कृषिमंत्र्यांनी सोमवारी (ता.१२) साप्ताहिक आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये गहू उत्पादन परिपक्व अवस्थेत असून उष्णतेचा गव्हावर परिणाम होणार नसल्याचाही कृषिमंत्र्यांनी दावा केला.

एप्रिल आणि मेमधील उष्णतेच्या लाटांमुळे गहू उत्पादनावर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु मेच्या दुसऱ्या आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे गहू काढणीनं वेग घेतला आहे. पीकही परिपक्व झालं आहे. त्यामुळे उत्पादनाच्या अंदाजावर परिणाम होण्याची चिन्हं नाहीत, असं कृषी मंत्रालयाने सांगितलं आहे.

मागील वर्षी गहू उत्पादन ११३.१३ दशलक्ष टन राहिलं. परंतु यंदा मात्र कृषी मंत्रालयाने ११५.३ दशलक्ष टन गहू उत्पादन राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गहू उत्पादनात २ टक्के वाढीचा अंदाज आहे. परंतु विविध भागात अवकाळी पाऊस आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे गहू उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. तसेच उष्णतेच्या लाटांचाही गहू उत्पादनावर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगतात.

देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांमध्ये गहू काढणीनं वेग घेतला आहे. २ मेपर्यंत मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातमधील गहू काढणी पूर्ण झाली आहे. तर पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काही भागात गव्हाची काढणी सुरू आहे. अन्न महामंडळाकडून गहू खरेदी सुरू आहे. त्यामुळे सरकारी खरेदीचं उद्दिष्ट यंदा गाठता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सध्या देशात गव्हाचा साठा १७७.०७ लाख टन आहे. संरक्षित साठा (बफर) १०२.४७ लाख टनांचा आहे. म्हणजेच बफरपेक्षाही ७४.६० लाख टन अधिकचा गव्हाचा साठा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने गहू निर्यात बंदी खुली करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु केंद्र सरकार सध्या गहू निर्यात बंदी उठवण्याबाबत सकारात्मक दिसत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT