Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : बँकांनी पीककर्जाची गती वाढवावी

Kharif Crop Loan : प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. एकही शेतकरी यापासून वंचित राहू नये. त्यामुळे बॅंकांनी आपल्या कर्जवाटपाची गती वाढवावी.

Team Agrowon

Yavatmal News : प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. एकही शेतकरी यापासून वंचित राहू नये. त्यामुळे बॅंकांनी आपल्या कर्जवाटपाची गती वाढवावी. ज्या बॅंकांचे वाटप कमी आहे, त्यांनी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केल्या.

महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बॅंकांकडून पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक ज्ञानेश्वर टापरे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अतुल इंगळे तसेच सर्व बॅंकांचे जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी बॅंकनिहाय पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला. काही बॅंका वाटपात मागे असल्याने त्यांना विशेष प्रयत्नाने कर्ज वाटप वाढविण्याच्या सूचना केल्या. शाखा स्तरावर बॅंकांनी प्रयत्न करावे. एकही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहू नये.

कर्ज वाटपाबाबत शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण केले जावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकरी किंवा विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होते. ही रक्कम बॅंका परस्पर कपात करतात. ही रक्कम कपात न करता लाभार्थ्यांना परत देण्यात यावी. याबाबत शेतकरी, लाभार्थ्यांच्या तक्रारी येता कामा नये, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

एकमुस्त रक्कम भरणाऱ्यांना तातडीने कर्ज द्या

बरेच शेतकरी आपल्याकडील थकीत कर्जाची रक्कम एकमुस्त भरून कर्ज खाते निल करतात. अशा शेतकऱ्यांना काही बॅंका नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी येतात. ज्यांनी पूर्णपणे कर्जाचा भरणा केला आहे, अशा शेतकऱ्यांना तातडीने नव्याने पीककर्ज बॅंकांनी दिले पाहिजे.

९८ हजार शेतकऱ्यांना १ हजार १८ कोटीचे वाटप

जिल्ह्यात आतापर्यंत सर्व बॅंकांनी मिळून एकूण ९८ हजार शेतकऱ्यांना १ हजार १८ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकने ५० हजार शेतकऱ्यांना ४४७ कोटीचे वाटप केले आहे.

त्यानंतर स्टेट बॅंक ऑफ इंडियाने १२ हजार शेतकऱ्यांना १३१ कोटी, विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने ८ हजार ७०० शेतकऱ्यांना ११९ कोटी, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने ६ हजार ७०० शेतकऱ्यांना ७२ कोटीचे वाटप केले आहे. ज्या बॅंकांनी चांगले वाटप केले त्यांना अभिनंदनाचे तर ज्यांचे वाटप कमी आहे, त्याने गती वाढविण्याच्या सक्त सूचना देणारे पत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT