Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : ग्रामीण भागाच्या अस्तित्वासाठी शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही

Agriculture Alternative : शेती हेच शाश्वत रोजगाराचे साधन आहे. भविष्यात ग्रामीण भागाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही.

Team Agrowon

Sindhudurga News : शेती हेच शाश्वत रोजगाराचे साधन आहे. भविष्यात ग्रामीण भागाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. तरुण वर्गाला शेतीत आणण्यासाठी सामाजिक पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेत्या कमला परूळेकर यांनी व्यक्त केले.

गोपुरी आश्रमाच्या वतीने दिला जाणारा गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार नाधवडे (ता. वैभववाडी) येथील प्रगतिशील महिला शेतकरी राखी राजेश तावडे यांना प्रदान करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, उपाध्यक्ष व्ही. के. सावंत, सचिव विनायक मेस्त्री, संचालिका अर्पिता मुंबरकर, राजेश तावडे, प्रमोद सावंत, विनायक सापळे, सुरेश रासम, आशिष सावंत, जावेद खान, सदाशिव राणे आदी उपस्थित होते.

श्रीमती परूळेकर म्हणाल्या, की भविष्यात सिंधुदुर्गातील शेतीला चांगले दिवस येण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी न विकता आपल्या जमिनीत कष्ट करायला हवेत.

शासनाने नागरिकांना शेती यंत्रे द्यावीत, जेणेकरून शेतकऱ्यांचे श्रम कमी होऊन फायदेशीर शेती करता येईल. राखी तावडे म्हणाल्या, की कष्टाला शासनाच्या योजनांची साथ मिळाली. कृषी विभागाने सहकार्य केले. शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली. केवळ भातपिकावर अवलंबून न राहता कडधान्यासारखी पिके घेतली. त्याचा फायदा झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT