Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : बीड जिल्ह्यात नऊ लाख क्विंटल साखर उत्पादन

Sugarcane Season : मागील तीन वर्षांपासून होणाऱ्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले होते; परंतु यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.

Team Agrowon

Beed News : मागील तीन वर्षांपासून होणाऱ्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढले होते; परंतु यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्यस्थितीत बीड जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी १३ लाख ७५ हजार ३११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून,

सरासरी ९.५७ साखर उताऱ्यानुसार एकूण नऊ लाख २० हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन जिल्ह्यात झाले आहे. यासह जिल्ह्यात सुरु असलेल्या गूळ पावडर उद्योगालाही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे.

गोदावरी, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका यासारख्या नद्या जिल्ह्यातून गेल्या असून, मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेले माजलगाव धरण, बिंदुसरा प्रकल्प, कुंडलिका प्रकल्प जिल्ह्यात आहेत. याशिवाय गोदावरी नदीवर बांधलेल्या उच्चपातळी बंधाऱ्याचा लाभही गेवराई, माजलगाव, परळी सारख्या तालुक्याला मोठ्या प्रमाणात होतो.

यामुळे जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त भागातील शेती पाण्याखाली येत असल्याने ग्रीन बेल्ट म्हणून जिल्ह्याची ओळख आहे. दरवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास जिल्ह्यात उपलब्ध झालेल्या पाण्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. यामुळे शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यासाठी साखर कारखान्यांची संख्याही सर्वाधिक आहे.

यंदा जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असून, इतर कारखाने बंद आहेत. सध्यस्थितीत लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना (तेलगाव, ता. धारूर), जय महेश साखर कारखाना (एनएसएल शुगर्स) पवारवाडी (ता. माजलगाव), छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव (ता. माजलगाव), जय भवानी साखर कारखाना (गढी, ता. गेवराई), गंगा माऊली साखर कारखाना (केज),

येडेश्वरी साखर कारखाना (केज) या सहा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु असून, या कारखान्यांनी शनिवारपर्यंत (ता. २२) १३ लाख ७५ हजार ३११ मेट्रिक टन उसाचे गाळप करत, सरासरी ९.५७ साखर उताऱ्यासह एकूणनऊ लाख २० हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT