graps farms Agrowon
ॲग्रो विशेष

Nanded Fruit Insurance : नांदेडला द्राक्षाची लागवड शून्य; विम्यासाठी १९ मंडळ अधिसूचित

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : नांदेड जिल्ह्यात एक गुंठाही द्राक्षाची लागवड नसताना विमा कंपनीने सात तालुक्यांतील तब्बल १९ मंडळे अधिसूचित करून द्राक्ष पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : नांदेड जिल्ह्यात एक गुंठाही द्राक्षाची लागवड नसताना विमा कंपनीने सात तालुक्यांतील तब्बल १९ मंडळे अधिसूचित करून द्राक्ष पिकासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू केली आहे.

कृषी विभागाकडे द्राक्षाची लागवड शून्य हेक्टर असताना विमा कंपनीने १९ मंडळे कशाच्या आधारावर अधिसूचित केले या बाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना नुकतीच लागू करण्यात आली आहे. या बाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून ५ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धी पत्रक काढून यात शेतकऱ्‍यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

यात आंबिया बहर रब्बी २०२३-२४ वर्षासाठी शासन निर्णयानुसार जिल्ह्यामध्ये फळपीकविमा योजना आंबा, केळी, मोसंबी यासोबत द्राक्ष या अधिसूचित पिकांकरिता अधिसूचित महसूल मंडळांमध्ये राबविण्याचे कळविले आहे.

भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या कंपनीकडून ही योजना राबविण्यात येत आहे. यात द्राक्षासाठी सात तालुक्यांतील १९ मंडळे अधिसूचित करून या मंडळांतील शेतकऱ्‍यांनी विमा भरण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

आंबिया बहरामध्ये द्राक्षासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी १६ हजार रुपये विमा भरावा, तर यासाठी हेक्टरी तीन लाख वीस हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. परंतु नांदेड जिल्ह्यात एक गुंठा क्षेत्रावर द्राक्षाची लागवड नाही. द्राक्षाच्या लागवडीबाबत कृषी विभागाकडे एका हेक्टरचीही नोंद नाही.

द्राक्षाचा विम्यासाठी अधिसूचित मंडळे

अर्धापूर तालुका : अर्धापूर, दाभड, मालेगाव

देगलूर तालुका : मरखेल, हाणेगाव

नांदेड तालुका : तरोडा बुद्रुक, तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी

भोकर तालुका : भोकर

मुदखेड तालुका : मुदखेड, बारड, मुगट

लोहा तालुका : शेवडी (बा.)

हदगाव तालुका : हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT