Team Agrowon
विद्राव्य खते सिंचनाच्या पाण्यासोबत देता येत असल्यामुळे पिकाच्या गरजेप्रमाणे अनेक वेळा विभागून देता येतात. त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ लागत नाही. तातडीने पुरवठा करायचा असल्यास फवारणीद्वारेही विद्राव्य खते देता येतात.
विद्राव्य खते ही रासायनिक घन खतांच्या तुलनेत पिकांना लवकर उपलब्ध होतात.
अन्नद्रव्याचा तातडीने पुरवठा करायचा असल्यास ही खते फवारणीद्वारेही देता येतात.
पिकांचे उत्पादन आणि रासायनिक खताचा वापर यात सांगड घालणे सोपे जाते.
पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेतून निचरा होण्याची किंवा वायुरूपात वाया जाण्याची शक्यता कमी असते.
या खतांमुळे जमिनीच्या गुणधर्मावर परिणाम होत नाही.
पाण्यात विरघळणारी (विद्राव्य) खते -पाण्यात विरघळणाऱ्या स्फटिक किंवा दाणेदार स्वरूपामध्ये येणारी ही खते पाण्यात उत्तम विरघळतात.