Agriculture Department WhatsApp channel Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Scheme WhatsApp channel : शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे व्हॉट्‌सअॅप चॅनेल

Agriculture Department : शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना, उपक्रम, कृषी मार्गदर्शन याविषयक माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे व्हॉटसअॅप चॅनेल सुरू करण्यात आले आहे.

Team Agrowon

Akola News : अकोला ः शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना, उपक्रम, कृषी मार्गदर्शन याविषयक माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे व्हॉटसअॅप चॅनेल सुरू करण्यात आले आहे. या चॅनेलचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याहस्ते झाले.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे उपस्थित होते.
समाज माध्यमांचा वापर सध्या सर्वत्र केल्या जातो. शेतकऱ्यांपर्यंत कृषी विभाग, शासनाच्या योजना, उपक्रम, कृषी मार्गदर्शन याबाबतचे संदेश पोहोचविण्यासाठी हे चॅनेल उपयुक्त ठरेल,

असा विश्वास जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी व्यक्त केला. कृषी विभागाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम हातात घेतला आहे. याचा निश्‍चितच शेतकऱ्यांना येत्या काळात चांगला फायदा होईल. शेतकऱ्यांना योजनांची, उपक्रमांची माहिती मिळू शकेल, असा आशावादही या वेळी व्यक्त करण्यात आला.

-जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या चॅनेलच्या माध्यमातून तत्काळ माहिती उपलब्ध होऊ शकेल. आज प्रत्येक घरात व्हॉटसॲपचा वापर होत असतो. हे माध्यम माहिती पोचवण्यासाठी प्रभावी ठरेल.
-शंकर किरवे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT